Recovery esakal
नाशिक

नाशिक : सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या २४८ जणांकडून अडीच लाख वसूल

विनोद बेदरकर

नाशिक : स्वच्छ शहराच्या स्पर्धेत नाशिक (nashik) शहराचा पहिला क्रमांक येण्यासाठी ऑनलाइन स्पर्धेत सहभागाची गती वाढत असताना सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या २४८ जणांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली.

स्वच्छ शहरांमध्ये वरच्या नंबरला आणण्यासाठी महापलिकेसह शहरातील सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकारी सक्रिय झाले आहे. असे असताना महापालिकेने शिस्त लावण्यासाठी कंबर कसली आहे. महापालिकेतर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांना गालबोट लावणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर महापालिकेने कारवाया सुरू केल्या आहेत. काही महिन्यांमध्ये नाशिक महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या २४८ जणांवर कारवाई करून अडीच लाखाचा दंड वसूल केला आहे.

स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथकदेखील नाशिकला (nashik) येऊन गेले. सध्या त्याला फीडबॅक देण्याचे काम सुरू असले तरी काही विशिष्ट नागरिक नाशिकला स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या कामात खोडा निर्माण करीत आहे. याचाच एक भाग म्हणून नको त्या ठिकाणी थुंकणाऱ्या व घाण करणाऱ्या नागरिकांवर महापालिकेकडून आता कारवाई सुरू करण्यात आली आहे. गत काही काळामध्ये २४८ जणांवर महापालिकेने (nmc) कारवाया करीत अडीच लाख रुपयांचा दंड वसूल केला. घनकचरा संचालक डॉ. आवेश पलोड यांनी ही माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT