two minor girl molested in nashik.jpg
two minor girl molested in nashik.jpg 
नाशिक

लज्जास्पद! अश्लील चाळे करत 'तो' रोज द्यायचा त्रास...विचारणा केली तर जीवे मारण्याची दिली धमकी

सकाळवृत्तसेवा

नाशिक : गंगापूर हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांत एका अल्पवयीन मुलीसह एका युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अशी आहे घटना

धर्माजी कॉलनीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भूषण निकम असे संशयिताचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. 18) रात्री साडेआठच्या सुमारास धर्माजी कॉलनीत पीडित मुलीचा संशयित भूषणने पाठलाग केला आणि शीळ वाजवून तिच्याकडे पाहत अश्‍लील चाळे केले. पीडितेच्या वडिलांनी जाब विचारला असता संशयिताने दमदाटी केली.

तर दुसऱ्या घटनेत मनोज गायकवाड (वय 18, रा. जाधव मळा, गंगापूर रोड) असे संशयिताचे नाव असून पीडितेच्या फिर्यादीनुसार, बुधवारी रात्री आठच्या सुमारास पीडित युवती आनंदवली बसस्टॉप ते टेलिफोन ऑफिस रस्त्याने जात असताना, संशयित मनोजने तिचा पाठलाग केला आणि लग्नाची मागणी केली, पीडितेने नकार दिला. संशयिताने पीडितेच्या आई व भावाला शिवीगाळ करीत मारून टाकण्याची धमकी दिली. या दोन्ही प्रकरणी गंगापूर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT