eSakal (30).jpg 
नाशिक

सुर्यास्त पाहण्यास गेलेल्या 6 मित्रांच्या ग्रुपमधील २ मित्रांच्या जीवनाचा अस्त; ती पिकनिक ठरली अखेरची!

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक / गिरणारे : सोमवारी (ता.५) दुपारी दोनच्या सुमारास सहा मित्रांचा ग्रुप दुचाकींवरून फिरण्यासाठी गंगापूर धरण परिसरात गेले. ते सर्व जण सायंकाळी सूर्यास्त बघून घरी परतणार होते. पण तिथेच दोघांच्या जीवनाचा अस्त झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

सुर्यास्त पाहण्यास गेलेल्या २ मित्रांच्या जीवनाचा अस्त

सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास सहा मित्रांचा ग्रुप दुचाकींवरून फिरण्यासाठी गंगापूर धरण परिसरात गेले. ते सर्व जण सायंकाळी सूर्यास्त बघून घरी परतणार होते. फोटो काढण्याच्या नादात कैफ उमर शेख, साबीर सलीम बेग अचानक पाण्यात कोसळले. एकमेकांना वाचविण्यासाठी दोघांनी प्रयत्न केला. मात्र, पोहता येत नसल्याने व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. या वेळी त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्यासोबत आलेले अन्य मित्रही त्यांच्या मदतीसाठी धावले. मात्र, तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडाले होते.

दोघे धरणातील पाइपमध्ये अडकले

मित्रांनी आजूबाजूला धाव घेत स्थानिक युवक व नागरिकांना सांगून मदतीला बोलावले. काही स्थानिक जलतरणपटूंनी पाण्यात सूर लगावत दोघांचा शोध सुरू केला. सुमारे तासाभरानंतर कैफ आणि साबीर यांचे मृतदेह हाती आले. दोघे धरणातील पाइपमध्ये अडकले होते. उर्वरित चौघांनी परिसरात येऊन माहिती दिली. त्या दोघांच्या मृत्यूने जुने नाशिक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्री उशिरा रसूलबाग कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला.  

दोन अल्पवयीन मुलांचा धरणात बुडून मृत्यू

गंगापूर धरण  परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या सहा मित्रांपैकी दोन अल्पवयीन मुलांचा धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. ५) सायंकाळी घडली. कैफ उमर शेख (वय १५), साबीर सलीम बेग (१६, दोघे रा. खडकाळी, त्र्यंबक पोलिस चौकीमागे) अशी मृतांची नावे आहेत. शेख फरान सत्तर (१७), सुफियान हसन चांद (१५), सुफियान जमीर शेख (१७), कैफ नसीर खान (१७) हे चौघे वाचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma:'नाही... नाही...' गिल ओरडत राहिला, पण रोहित ऐकला नाही; धावबाद होताच रोहित तापला म्हणाला...

अत्याचार आणि खुनासारख्या विषयावर कॉमेडीयनचा घाणेरडा विनोद; म्हणतो, 'सगळं करून झाल्यावर पीडित मुलगी...'

Career Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक असतात प्रचंड मेहनती; पण कष्टाला मिळत नाही नशिबाची जोड, दरवेळी थोडक्यात हुकते संधी

Latest Live Updates Marathi: प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमबाह्य गर्भपात? बीडमध्ये खळबळजनक घटना

BMC Action: 'त्या' कंत्राटदारांना ९.२५ कोटींचा दंड! एआय प्रणालीचा वापर, बिलांमधून दंडाची वसुली सुरू

SCROLL FOR NEXT