Two trucks caught fire
Two trucks caught fire  sakal
नाशिक

मालेगाव : शहरातील जुन्या महामार्गावर दोन ट्रकला आग

प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहरातील जुन्या महामार्गावर दोन ट्रकला मुख्य वीज वाहिनीचे शॉर्टसर्किट होवून आगीचे लोळ पडल्याने आग लागली. या आगीत एक ट्रक व त्यातील शेती उपयोगी औषधे जळून खाक झाली. दुसऱ्या ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने लाखोचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मंगळवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास फरान हॉस्पीटलनजीक हा प्रकार घडला. महापालिका अग्निशमक दलाच्या दोन बंबांनी चार खेपा करुन आग आटोक्यात आणली. वीज वाहिन्याच्या शॉर्टसर्किटने महामार्गानजीक उभ्या असलेल्या दोन ट्रकला (एमएच १८ एन ४४७४) (एमएच ०४ ईबी ३०९९) आग लागली. सुरुवातीला एका ट्रकला आग लागली. दुसरा ट्रक तातडीने अन्यत्र न हलविल्याने तोही आगीच्या ज्वाळांनी वेढला गेला. मनपा अग्निशामक दलाचे जवान तातडीने दाखल झाले. अग्निशमन अधिक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी तातडीने आग विझवली. नुकसानीचा पंचनामा करणे सुरु आहे. यामुळे नुकसानीचा निश्‍चित अंदाज समजू शकला नाही. मनपा अग्निशामक दलात नोंद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT