Vande Bharat Express esakal
नाशिक

Vande Bharat Express : राज्यात दोन वंदे भारत एक्स्प्रेस; पुढील आठवड्यापासून धावणार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : राज्यात सध्या मुंबई -गांधीनगर आणि नागपूर बिलासपूर या दोन मार्गावर सध्या वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येत आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सीएसएमटी (मुंबई) -साईनगर शिर्डी आणि सोलापूर-सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. (Two Vande Bharat Express in state Will run from next week nashik news)

या सेवेमुळे मुंबई ते सोलापूर हा प्रवास केवळ साडे सहा तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. सध्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसला मुंबई ते सोलापूर अंतर कापण्यासाठी आठ तास लागतात. तसेच सीएसएमटी साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमधून पाच तास ५५ मिनिटांत प्रवास पूर्ण होणार आहे.

या गाडीला १६ डबे, १,१२८ प्रवासी क्षमता असून देशभरात चालवण्यात येणाऱ्या वंदे भारतची बांधणी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात येत आहे. जीपीएस आधारित ऑडिओ व्हिज्युअल प्रवासी माहिती प्रणालीने हे डबे सज्ज असणार आहेत. प्रत्येक ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ मध्ये १६ एसी डबे आहेत.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

' तर एका गाडीची प्रवासी क्षमता एक हजार १२८ इतकी आहे. ह्या गाड्या सीएसएमटी-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातील सहा दिवस धावणार (गुरुवार वगळता) असून ५ तास ५५ मिनिटांचा प्रवास होणार आहे. सीएसएमटीतून सायंकाळी सव्वा सहा वाजता सुटून रात्री १२ वाजून १० मिनिटांनी पोहोचणार आहे. दादर, ठाणे, नाशिक रोडला थांबा आहे.

याच प्रमाणे सोलापूर- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस बुधवार वगळता आठवड्यातील सहा दिवस धावेल. (बुधवार वगळता). सोलापूर येथून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी सुटून दुपारी १२.३५ वाजता सीएसएमटीला पोहोचणार आहे. दादर, ठाणे, लोणावळा, पुणे, कुर्डुवाडीला थांबणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT