Superintendent of Police shahaji Umap esakal
नाशिक

Nashik | जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांना ‘अल्टिमेटम्‌’ : पोलीस अधीक्षक उमाप

नरेश हाळणोर

नाशिक : नाशिक ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. चोरीछुप्या रितीने सुरू असलेल्या अवैध गुटखा, मद्यसाठ्यासह जुगार अड्डे चालविणाऱ्यांना तात्काळ बंद करण्याचा अल्टिमेटम देतानाच, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्यांनाही कारवाई करण्याचे आदेश बजावले आहेत. तसेच, गाव-परिसरातील अवैध धंद्यांची माहिती देण्यासाठी सर्वसामान्यांकरीता स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असून, तक्रारदाराचे नाव गुपित ठेवले जाईल. त्यामुळे अवैध धंद्यांविरोधात माहिती देण्याचे आवाहनच पोलीस अधीक्षक उमाप यांनी केले आहे. (Ultimate to illegal businessmen in district by Superintendent of Police shahaji Umap Nashik news)

नाशिक ग्रामीण अधीक्षकपदी नियुक्त झाल्यापासून शहाजी उमाप यांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. घोटीमध्ये दोनवेळेस अवैध गुटखा व मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. आता सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यासाठी सर्व निरीक्षकांना पंधरा दिवसांचा ‘अल्टिमेटम’ देण्यात आला आहे. तर, लवकरच सामान्य नागरिकांसाठी अवैध धंद्यांविरोधात तक्रारीसाठी ‘हेल्पलाइन’ कार्यान्वित होणार असल्याचे सूतोवाच अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांची बैठक घेतली. अवैध धंदे कोणत्याही हद्दीत सुरू राहणार नाहीत, यासंदर्भात आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, पंधरा दिवसांचा अवधी संपल्यावर जिथे अवैध धंदे असतील, तिथे धडक कारवाई करण्यात येईल. नुकत्याच घोटी तालुक्यात झालेल्या दोन कारवायांमध्ये पोलिस अधीक्षक यांनी ‘लीड’ केला आहे. यामुळे निरीक्षकांनीही तातडीने हद्दीमध्ये अवैध धंदे बंद करण्यास सुरुवात केली आहे.

यासहित नागरिकांना अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधणे अनेकदा अवघड जाते. तर, गावपातळीवर अनेक छुप्यारित्या अवैध धंदे सुरू असतात. त्यानुसार नागरिकांसाठी स्वतंत्र ‘हेल्पलाइन’ कार्यान्वित करण्याचे अधीक्षकांच्या विचाराधीन आहे. त्यामुळे थेट नागरिकांकडूनच आता अवैध धंद्यांच्या तक्रारी अधीक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत. यासह आंतरजिल्हा बदल्यांमध्ये बनावट वैद्यकीय अहवाल सादर झाल्याच्या प्रकरणाचाही फेरआढावा अधीक्षक घेत आहेत. यामुळे या प्रकरणात सदोष असलेल्या अधिकाऱ्यांसहित कर्मचाऱ्यांची सुटका होणार नसल्याचे संकेत आहेत.

"नाशिक जिल्ह्यात अवैध धंदे बंद ठेवण्यावर भर असेल. पोलिस ठाणेनिहाय अपेक्षित मनुष्यबळाचे नियोजन सुरू आहे. ‘डायल ११२’च्या प्रतिसाद वेळेबाबतही पडताळणी करीत आहोत. नागरिकांना अधीक्षक कार्यालयाशी गोपनीय माहिती कळवता येईल, अशी सुविधा करणार आहोत." - शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT