Nashik Commissioner of Police ankush shinde  esakal
नाशिक

Nashik News: आयुक्तांकडून अवैध धंद्यांविरोधात ‘समज’! लेखी दिल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे धाबे दणाणले

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिस आयुक्तांनी कडक धोरण अवलंबलेले आहे. असे असतानाही काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर शहर गुन्हे शाखेच्या पथकांकडून कारवाई होत आहे.

त्यामुळे पोलिस ठाण्यांची भूमिका संशयास्पद आहे. याबाबत पोलिस आयुक्तांनी आढावा घेताना पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांवर निशाणा साधताना लेखी ‘समज’ देत खडसावले आहे. यामुळे पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे धाबे दणाणले आहे. (Understanding from Commissioner against illegal businesses Giving letter shocked senior police inspectors Nashik News)

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना दिलेले आहेत. तसेच अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई करण्यासाठी शहर गुन्हे शाखांसह नेमलेल्या पथकांनाही दिले आहेत.

तसेच त्यासंदर्भात पंधरवड्याच्या बैठकीत आढावाही घेतला जातो. आढावा बैठकीत आयुक्त शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत आयुक्तालय हद्दीतील १३ पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना धारेवर धरले.

शहर हद्दीमध्ये सातत्याने मटका, जुगारअड्डे, अवैध दारूविक्री याविरोधात शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक, दोन तसेच अंमली पदार्थविरोधी पथकांकडून कारवाई केली जात आहे.

वास्तविक, या अवैध धंद्यांविरोधात पोलिस ठाण्यांच्या पथकांकडून कारवाई होणे अपेक्षित असताना, तसे होत नसल्याने आयुक्त शिंदे यांनी पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शहर गुन्हे शाखांकडून जुगार, मटके, अवैध मद्यविक्रीची कारवाई केल्यानंतर ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई झाली त्या पोलिस ठाण्याच्या प्रमुखांकडे आयुक्तालयाकडून खुलासा मागविला जात असला तरी यापुढे मात्र थेट ठाण्याच्या प्रमुखांवर कारवाईचे संकेत आयुक्त शिंदे यांनी दिले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यामुळे पोलिस आयुक्तालय हद्दीतील १३ पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे धाबे दणाणले आहे.

लेखी ताकीद

नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाई केली होती, त्या तीन पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना थेट लेखी समज देण्यात आले आहेत.

आयुक्त शिंदे यांच्या या भूमिकेमुळे आता पोलिस ठाण्यांची पथकेही अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करताना दिसतील. आयुक्तांच्या या धोरणामुळे एकीकडे पोलिस ठाण्याचे प्रमुख आणि दुसरीकडे अवैध व्यावसायिकांचेही धाबे दणाणले आहे.

"अवैध धंद्यांविरोधात पोलिस अधिकाऱ्यांना थेट कारवाईचे आदेश दिलेले आहेत. ज्या प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास येतील, त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल." -अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT