Kumbh Mela dates being handed over to Mahamantri Harigiri and Sagarane Swami by Purohit Sangh. esakal
नाशिक

Nashik : आगामी कुंभमेळा सन 2027 च्या तारखा आखाडा परिषदेकडे सादर

कमलाकर अकोलकर

नाशिक : येथील श्रीपंच शंभु दशनाम जुना आखाडा येथे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे (Akhil Bharatiya Akhada Parishad) महामंत्री हरिगिरी महाराज आठ दिवसांपासून वास्तव्यास आले आहेत. त्यांच्या उपस्थिती मध्ये जुना आखाड्यातील साधु महंत यांनी हजेरी लावली असुन आघाड्याचे अंतर्गत प्रश्नावर येथे विविध निर्णय घेण्यात आले आहे. (Upcoming Kumbh Mela 2027 dates presented to Akhada Parishad Nashik Kumbh Mela news)

आज आषाढ शुद्ध प्रतिपदा व गुरुपुष्यांमृत योगाचे औचित्य साधुन महामंत्री हरिगिरी, या आघाड्याचे महामंडलेश्वर शिवगिरीजी, श्री पंचायती आनंद आघाड्याचे गणेशाने सरस्वती, जुना आखाड्यातील विष्णुगिरी, निळकंठ गिरी, ईच्छागिरी , साध्वी शैलजा माता यांनी सकाळी कुशावर्तातीर्थात स्नान करुन आद्य ज्योतिर्लिंग त्रंबकेश्वराचे दर्शन व अभिषेक पूजा केली. त्यांच्या समवेत आघाड्याचे पुरोहित त्रिविक्रम जोशी व प्रमोद बाळकृष्ण जोशी उपस्थित होते.

दर्शन पुजेनंतर सर्व उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. व आगामी कुंभमेळ्याच्या (Kumbha Mela) तारखा पुढील नियोजनासाठी पुरोहित संघ त्रंबकेश्वर यांच्या वतीने महामंत्री हरिगिरी यांच्याकडे देण्यात आल्या.

आगामी त्रंबकेश्वर येथील सन 2027च्या कुंभमेळा पर्वकाळ व शाही स्नान तारखा.

सिंहस्थ ध्वजारोहण (प्रारंभ) अश्विन वद्य षष्ठी शनिवार. 31/10/2026

प्रथम शाही स्नान. आषाढ कृष्ण अमावास्या. मंगळवार ता. 2/08/2027.

द्वितीय शाही स्नान. श्रावण वद्य अमावास्या. ता. 31/08/2027.

तृतीय शाही स्नान. भाद्रपद शुद्ध द्वादशी. ता. 12/09/2027.

पर्वकाळ समाप्ती. ) ध्वजावतरण. ता. 24/07/2028।

येथे सिंह राशीत गुरु असतांना वर्षभर महापर्वकाल असतो. परंतु शाही स्नान हे तिथी नुरुप असल्याने निश्चित असतात. असे असूनही आखाडा परिषदेच्या संयुक्त बैठकीत त्याची निश्चिती करुन जाहीर केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT