Wedding Ceremony
Wedding Ceremony esakal
नाशिक

एका लग्नाची अनोखी गोष्ट! या विवाहसोहळ्याची सर्वदूर चर्चा

सागर आहेर

चांदोरी (जि. नाशिक) : लसीकरणाचे (Vaccination) प्रबोधन व्हावे यासाठी वेगवेगळ्या शक्कल प्रशासन लढवत असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र डोंगरवाडी दारणा- सांगवी (ता. निफाड) मध्ये एका लग्न सोहळयात चक्क वऱ्हाडी मंडळींच लसीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर, लसीकरणाचं प्रमाणपत्र असेल तरच विवाह मंडपात प्रवेश दिला जातोय. या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.

या विवाह सोहळ्याची भन्नाट चर्चा

लग्न सोहळ्यात आलेल्या नातेवाईंकांचे लसीकरण झाले नसेल तर तिथेच सोहळ्यातच लस देण्यात येते. त्यामुळे या विवाह सोहळ्याची भन्नाट चर्चा सुरू आहे. डोंगरवाडीचे वाल्मिक रोहम यांची कन्या माधुरी आणि निरपूर (ता. सटाणा) येथील संजय चव्हाण यांचा मुलगा सौरभ यांचा विवाह सोहळा १० फेब्रुवारी २०२२ रोजी डोंगरवाडी, दारणासांगवी (ता. निफाड) येथे आयोजित करण्यात आला होता. संयोजकांनी लसीची सक्ती केली आहे. लग्नात होत असलेल्या लसीकरणाच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अॅड नितीन ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, डॉ प्रल्हाद डेर्ले, जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक पिंगळे, सरपंच कांतिलाल बोडके, सुनील साळवे, पोलिस पाटील गोरक्षनाथ काकड, सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी, तलाठी कल्पना पवार आदींच्या हस्ते या लग्न मंडपातील लसीकरणाचा शुभारंभ झाला.

प्रशासनाला सहकार्याचा नवीन पायंडा

प्राथमिक आरोग्य केंद्र चांदोरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ ज्योती फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक अरुण कहांडळ, आरोग्य सेविका प्रिती इंगळे, धनु दरेकर, आशा सेविका वर्षा आहेर यांनी वऱ्हाडीमंडळींच लसीकरण केल.

दारणा सांगवी येथील अनोख्या विवाह सोहळ्यात लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करतांना नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील, सरपंच कांतीलाल बोडके, पोलिस पाटील गोरक्षनाथ बोडके, सुनील साळवे आदी.

''रोहम व चव्हाण परिवाराने लग्नाच्या निमित्ताने लसीकरण करत प्रशासनाला सहकार्याचा नवीन पायंडा पाडला. कौतुकास्पद असा निर्णय इतरांनीही याचे अनुकरण करावं.'' - सचिन पाटील, पोलिस अधिक्षक नाशिक ग्रामीण

''आरोग्य सेवा करताना प्रामुख्याने जास्तीत जास्त लसीकरण करण्याला प्राधान्य देत आहोत. आजही विवाहाच्या निमित्ताने लसीकरण कॅम्प लावला.'' - अरुण कहंडाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT