लस
लस sakal
नाशिक

नाशिक : अंथरुणावर पडलेल्या रुग्णांनाही टोचणार लस

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ओमिक्रॉनचा (omicron)सामना करण्यासाठी महापालिका सज्ज झाली असताना नागरिकांकडून मात्र हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लसीकरणाचा (vaccination)वेग वाढविण्यासाठी आता अंथरुणावर पडलेल्या रुग्णांनाही जागेवर लस टोचण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर ओमिक्रॉनचा (omicron) सामना करण्यासाठी सहा विभागात वॉर रूम कार्यान्वित करण्यात आला आहे.

कोरोना पहिल्या व दुसऱ्या लाटेचा यशस्वी सामना केल्यानंतर आता तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाल्याने त्यासाठी महापालिकेचा वैद्यकीय विभाग सज्ज झाला आहे. ओमिक्रॉन या पश्‍चिम आफ्रिकेत आढळून आलेल्या नव्या विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हीच कोरोनाची तिसरी लाट मानली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडून लसीकरणाचा वेग वाढविला आहे.

नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने स्कीन द्वारे न टोचणारी लस देण्याबरोबरच विविध कारणांमुळे अंथरुणावर पडून असलेल्या ज्या नागरिकांना उठता येत नाही, अशांना घरी जाऊन लस टोचण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, ओमिक्रॉनच्या तयारीची भाग म्हणून नवीन बिटको रुग्णालय, कठडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, समाजकल्याण कार्यालयातील कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधितांसाठी २५०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. कोविड सेंटरच्या जागेवर ऑक्सिजन प्लान्ट कार्यान्वित करण्यात आले असून, प्रतिदिन चारशे टन ऑक्सिजन उपलब्ध होईल याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे.

हेल्प सेंटर

पहिला व दुसऱ्या लाटेत महापालिकेने आयटी टीम कार्यान्वित केली आहे. शहरात कुठल्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहे. ते सेंट्रल बेड रिझर्व्ह सिस्टिममध्ये लक्षात यायचे त्याप्रमाणे तिसऱ्या लाटेतही आयटी टिम कार्यान्वित करण्यात आली आहे. महाकवच ॲप‍च्या माध्यमातून रुग्ण व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवली जाणार आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पंचवटी, नाशिक रोड, पूर्व, पश्‍चिम, सिडको व सातपूर विभागामध्ये वॉर रूम तयारी केली जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर बाधितांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी हेल्पसेंटर सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avinash Bhosale: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा! अखेर जामीन मंजूर

Gujarat News : 'तिला' डॉक्टर व्हायचं होतं, बोर्डाच्या परीक्षेत ९९ टक्के मिळाले; पण दुर्दैव...

EPFO Latest News : PF अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये, करा फक्त 'हे' काम

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 73,917 आणि निफ्टी 22,465 अंकांवर, कोणते शेअर्स वधारले?

Yed Lagla Premach: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT