Couple celebrating Valentine's Day expressing their love
Couple celebrating Valentine's Day expressing their love esakal
नाशिक

Valentines Day 2023 : तुझ्या- माझ्या प्रेमाचं नातं आयुष्यभर असंच रहावं! शहरात व्हॅलेंटाइन डे’चा फिवर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : तुझ्या, माझ्या प्रेमाचं हे नातं आयुष्यभर असंच रहावं, अशा शब्दात प्रेमभावना व्यक्त करत तरुणांनी मंगळवारी (ता. १४) व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव दिवसभर सुरू राहिला.

तर पंचवटीत गुलाबी फुग्यांपासून ह्रदयाच्या आकाराच्या ‘सेल्फी पॉइंट’ ने सर्वांचे लक्ष वेधले. हॉटेल, शोरूम, मॉलमध्ये आकर्षक सजावट करून विशेष सवलतही देण्यात आली. (Valentines Day 2023 fever in city nashik news)

महाविद्यालयीन तरुणांना सर्वाधिक आकर्षण असलेला व्हॅलेंटाइन डे उत्साहात साजरा झाला. तरुणांनी कॉलेजचे लेक्चरला दांडी मारुन पार्किंग व हॉटेलकडे आपला मोर्चा वळवला होता. नेहमीच्या कट्ट्यावर बसून मित्र, मैत्रिणींनी गप्पा तर मारल्या.

पण आजचा हा खास दिवस असल्याने आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुणांनी खास जागाही शोधली. प्रेमियुगलांसाठी हॉटेल चालकांनी मंगळवारी लाल, गुलाबी रंगाची फुले लावून सजावट केलेली दिसून आली.

केवळ हॉटेलमध्येच नव्हे तर, शोरूम, मॉलमध्येही ‘आय लव्ह नाशिक’, ‘आय लव्ह यू’, या शब्दांचे सेल्फी पॉइंट तयार केले होते. पंचवटीतील गुलाबी फुग्यांचा सेल्फी पॉइंटने सर्वांनाच आकर्षित केले. केवळ प्रेमीयुगलच नव्हे तर विवाहित पती, पत्नीने आपल्या प्रेमाची साक्ष हा सेल्फी पॉइंटवर दिली.

आपले व्यक्त करताना अनेकांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या स्वरूपाचे संदेश पाठवून आपल्या जोडीदाराला खूष करण्याचा प्रयत्न अनेकांना केला.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

प्रेमावर पहारे

आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचे फूल घेणाऱ्या तरुणांवर पोलिसांची दिवसभर करडी नजर होती. महाविद्यालयाबाहेर तसेच कॉलेज रोड, गंगापूर रोड, पंचवटी, सिडको, नाशिक रोड येथील महत्त्वाच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे व्हॅलेंटाइन डेच्या नावाखाली हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांनी चांगलाच ‘प्रसाद’ दिला.

९ जोडप्यांनी साधला विवाहाचा मुहूर्त

व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त साधत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील विवाह नोंदणी कार्यालयात मंगळवारी नऊ जोडप्यांनी विवाहाची नोंदणी केली. विवाहबद्ध होण्यासाठी कार्यालयात आलेल्या वधु, वरांसोबत वकीलही मोठ्या संख्येने हजर होते. त्यांच्या साक्षीने या नवदांपत्यांनी सांसारिक जीवनात प्रवेश केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT