MP Sanjay Raut sakal media
नाशिक

खा. राऊत यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम

विविध विकासकामांचे उद्‌घाटन व शिवसैनिकांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत दोन दिवस विविध विकासकामांचे उद्‌घाटन व शिवसैनिकांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख विजय करंजकर व महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.

कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी शिवसेना भवनमध्ये बैठक बोलाविण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. शहरात संघटनात्मक पातळीवर शिवसेनेची भक्कम फळी उभी राहिली असून, महापालिका निवडणुकीसाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर खासदार राऊत यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसैनिकांनी कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन महानगरप्रमुख बडगुजर यांनी केले. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, गटनेते विलास शिंदे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले.

खासदार राऊत यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे : सकाळी १० वाजता प्रभाग २१ मध्ये बिटको हॉस्पिटलचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय व विभागीय कार्यालयाचा नामकरण सोहळा, अंतर्गत रस्ते डांबरीकरण व जलकुंभ भूमिपूजन, सकाळी ११ वाजता प्रभाग दोनमध्ये अमृतधाम येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन, सकाळी साडेअकरा वाजता प्रभाग २६ मध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन, दुपारी १२ वाजता प्रभाग २४ मध्ये पर्यावरण निधीतून नंदिनी नदीवर संरक्षक जाळी बसविणे, दुपारी साडेबारा वाजता प्रभाग २६ मध्ये रामकृष्णनगर येथील सभामंडप व मंदिर परिसराचे सुशोभीकरण व उद्यानाचे लोकार्पण, प्रभाग २७ मध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा, सायंकाळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. या वेळी माजी महापौर विनायक पाडे, माजी आमदार योगेश घोलप, उपजिल्हाप्रमुख जगन आगळे, युवासेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे, देवानंद बिरारी, सचिन मराठे, महेश बडवे, सभापती प्रशांत दिवे, सुवर्णा मटाले, सूर्यकांत लवटे, मामा ठाकरे, संजय चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैताग आलाय, लोक विचारतायत, बायको विचारतेय...; भाजपच्या निष्ठावंताला अश्रू अनावर, उमेदवारी नाकारल्यास आत्मदहनाचा इशारा

Paradh News : दोन बांगलादेशीची स्वदेशात रवानगी; पोलिस ठाण्यात झाला होता गुन्हा नोंद

Latest Marathi News Live Update : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे शिवसेना प्रचार करण्यातून रडत पडले बाहेर

Winter Pregnancy Care: हिवाळ्यात गर्भातलं बाळही थंडी अनुभवतं! आई आणि बाळ सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Virat Kohli नवीन वर्षातही खेळणार विजय हजारे ट्रॉफीतील सामना, पण कधी आणि कोणाविरुद्ध? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT