फोटो : B05070
डीजीपीनगर : शारदादेवी शिक्षक सोसायटीच्या अध्यक्षपदी विनायक लाड यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करताना संचालक, विविध संघटनाचे पदाधिकारी.
शारदादेवी सोसायटीच्या
अध्यक्षपदी विनायक लाड
सकाळ वृत्तसेवा
डीजीपीनगर, ता. १५ : बिनविरोध निवडीचा प्रयत्न फसल्याने रंगलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ संचालक विनायक गणपत लाड यांनी बाजी मारली. त्यांनी शारदादेवी शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नऊ विरुद्ध पाच मतांनी दणदणीत विजय मिळविला.
सहायक उपनिबंधक कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी नीतू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडीसाठी बैठक झाली. आवर्तन पद्धतीने होणारी ही निवड बिनविरोध होण्यासाठी संचालक मंडळाच्या बैठकीत प्रयत्न करण्यात आले. मात्र, विरोधी गटातील निरगुडे आणि बाळासाहेब ढोबळे यांनी शरद बारकू काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीचे आव्हान उभे केले. त्यामुळे बिनविरोध निवडीची शक्यता मावळली. त्यानंतर झालेल्या मतदानात लाड यांनी नऊ मते मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात केली. विजयानंतर संचालक मोहन निकम, कांगणे, तेलोरे, विकास सहाणे, देवरे, सानप, एस. एल. कुवर, कैलास सूर्यवंशी, सतीश पवार, पवार, माजी आमदार शिवराम झोले, शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, मविप्रचे संचालक ॲड. संदीप गुळवे, मोहन चकोर, सचिन पगार, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पवार यांच्यासह मान्यवरांनी लाड यांचे अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.