death esakal
नाशिक

मरणानंतरही मायलेकराला 12 तासांची प्रतिक्षा; गरिबी किती पाहणार अंत?

विनोद बेदरकर

नाशिक : केवळ पैसे नसल्याने दुर्गम भागातील गरीब रुग्णांचे मृतदेह पडून राहत असल्याचे प्रकार वाढत आहेत. रविवारी मध्यरात्री दाखल झालेल्या अशाच एका अभागी महिला आणि तिच्या बाळाच्या नशिबी उपेक्षाच... तब्बल १२ तासांहून अधिक काळ दोघांचा मृतदेह तसाच पडून राहिला.

तब्बल १२ तासांची प्रतीक्षा

नाशिकला उपचारादरम्यान तिला येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. महिला व तिच्या बाळाचा मृतदेह पुन्हा अंत्यविधीला जव्हारला नेण्यासाठी तिचे कुटुंब सरकारी शववाहिकेची वाट पाहत राहिले. साधारण लहान बाळाचा मृत्यू झाला, तर तत्काळ नाशिकला अनेक कुटुंबे अंत्यसंस्कार उरकतात व मातेला मिळेल त्या खासगी वाहनाने गावाकडे घेऊन जातात, पण या दुर्घटनेत माता आणि तिचे बाळ असे दोन्ही मृतदेह असल्याने गावाकडे जाण्यासाठी त्यांना शववाहिका उपलब्ध झाली नाही. तब्बल दहा तासांच्या प्रतीक्षेनंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या यंत्रणेशी संपर्क साधला. सरकारी शववाहिका मिळेल या आशेवर तशाच पडून राहिलेल्या मृतदेहांना शववाहिका अखेरपर्यंत मिळालीच नाही. आमदार विवेक पंडित यांनी खटपट केल्यानंतर एका रुग्णवाहिकेतून हे दोन्ही मृतदेह दुपारी एकच्या सुमारास जव्हारला रवाना झाले. रेखा पोटिंदे (वय ३५, कायरी, पो. दाभेरी, ता. जव्हार) असे मृत मातेचे नाव आहे. शनिवारी (ता. २३) तिला प्रसूतिवेदना होऊ लागल्याने जव्हार रुग्णालयात दाखल केले होते. तेथून मध्यरात्री उशिरा नाशिकला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. बारा तासांनंतर एका आमदाराच्या प्रयत्नाने रुग्णवाहिका मिळाली. त्यानंतर १५ तासांनंतर मृतदेह घरी पोचला.

आर्थिक विवंचना हेच कारण

जव्हार-मोखाडा भागातील आदिवासी कुटुंबांना नाशिकला रुग्णालयात आणण्यापासून रोजच रुग्णवाहिका व शववाहिकांची प्रतीक्षा करावी लागते. शासनाने जिल्हा रुग्णालयांना नवीन रुग्णवाहिका दिल्या आहेत. मात्र, शववाहिका नाहीत. त्यामुळे दुर्गम भागातील रुग्णांना उपचारानंतर गावाला जाण्यासाठी एका रुग्णासाठी रुग्णवाहिकाही जात नाही. त्या भागात दोन-तीन रुग्ण असल्यास येथून रुग्णवाहिका पाठविल्या जातात. मात्र, शववाहिकाच नसल्याने मृतदेह स्वखर्चानेच न्यावे लागतात. खासगी शववाहिकेसाठी चार ते पाच हजारांवर खर्च येतो. एवढे पैसे या गरीब कुटुंबाकडे नसतात. त्यामुळे पैशाची सोय होईपर्यंत किंवा कुणीतरी दाता मिळेल या आशेवर अशा गरीब कुटुंबांना शववाहिका मिळेपर्यंत मृतदेह तसेच ठेवून प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नसतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे पुन्हा केले कौतुक, पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येण्याचे दिले संकेत

"एवढा खर्च तुम्हाला दाखवण्यासाठी केला, की..."; इंदुरीकर महाराजांचं अजब उत्तर, लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून झाली होती टीका

Mahavikas Aghadi Decision: सातारा जिल्ह्यातील सर्व पालिका एकत्र लढविणार; महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय; नेमकं बैठकीत काय घडलं?

CAT 2025 Exam: CAT 2025 परीक्षा 30 नोव्हेंबरला; निकाल जानेवारी 2026 मध्ये जाहीर होणार

मोठी बातमी! दुबार-तिबार मतदारांना नगरपरिषदेनंतर झेडपी, महापालिकेच्या मतदार यादीत नाव असल्यास तेथेसुद्धा करता येणार मतदान; काय आहे नेमका नियम? वाचा...

SCROLL FOR NEXT