नाशिक

होरायझन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची ‘माणुसकीची भिंत’ दिवाळीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांसाठी कपडे, खेळणी व उपयोगी वस्तूंचे संकलन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश

CD
पान-२--ॲंकर VNI26B13444 वणी ः येथील जगदंबा माता मंदिर परिसराच्या संरक्षक भिंतीवर ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम राबवताना मुख्याध्यापिका सोनाली काळे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक. ------------ माणुसकीच्या भिंतीद्वारे गरजूंच्या जीवनात फुलला आनंद ----------- वणीच्या होरायझन अकॅडमीचा उपक्रम ः गरजूंसाठी कपडे, खेळणी व उपयोगी वस्तूंचे संकलन ------------- सकाळ वृत्तसेवा वणी, ता.१३ : दिवाळीत समाजातील गरजू घटकांनाही सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने ‘मविप्र’ संचलित येथील होरायझन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी ‘माणुसकीची भिंत’ हा अभिनव सामाजिक उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी आपल्याकडील सुस्थितीतील कपडे, खेळणी तसेच दैनंदिन वापरातील उपयुक्त वस्तू या भिंतीच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. ----------- मुख्याध्यापिका एस. डी. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील वापरण्यायोग्य असलेले, मात्र सध्या स्वतःच्या उपयोगात नसलेले कपडे, खेळणी आणि अन्य वस्तू स्वेच्छेने जमा केल्या. या वस्तू येथील जगदंबा माता मंदिर परिसरातील भिंतीवर व्यवस्थितपणे टांगून ठेवल्या. ज्यांना या वस्तूंची आवश्यकता आहे, अशा गरजू विद्यार्थ्यांनी कोणताही संकोच न बाळगता आपल्या गरजेनुसार त्या घेऊन जाव्यात, अशी या उपक्रमामागील संकल्पना होती. तिला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक घरांमध्ये चांगल्या स्थितीतील कपडे, खेळणी आणि इतर वस्तू वापराविना पडून असतात. कालांतराने त्या निरुपयोगी समजून बाजूला ठेवल्या जातात. मात्र, त्याच वस्तू आर्थिक परिस्थितीमुळे नवीन वस्तू खरेदी करू न शकणाऱ्या कुटुंबांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी मोलाच्या ठरू शकतात. याच जाणिवेतून विद्यार्थ्यांनी वस्तूंचे पुनर्वापरासाठी हस्तांतरण करण्याचा सामाजिक उपक्रम प्रत्यक्षात आणला.विशेष म्हणजे, मदत करणारे आणि मदत स्वीकारणारे यांच्यातील अंतर कमी करून परस्पर सहकार्याची भावना जोपासण्याचा संदेशही या उपक्रमाने दिला. ---------------- १६-१ चौकट कृतिशील संस्काराची शाळा केवळ पुस्तकी शिक्षण न देता विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संवेदनशीलता, दातृत्व, सहकार्य आणि परोपकाराची भावना रुजविणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी एक कृतिशील संस्कारशाळाच ठरला. आपल्याकडील अतिरिक्त वस्तू दुसऱ्याच्या गरजा पूर्ण करू शकतात, याची जाणीव विद्यार्थ्यांना या उपक्रमातून झाली. सामाजिक भान जपणारी ही छोटीशी कृती इतर शैक्षणिक संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor: भारत समिटमध्ये 115 परदेशी वक्त्यांना प्रवेश नाकारला; शशी थरूर यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

IND vs NZ 4th ODI: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Unplayable Deliveries असं काही नसतं, फलंदाजानं...; ८९ ऑल आऊटनंतर गौतम गंभीरकडून कानउघडणी

Thane Water Cut: ठाण्यात पुन्हा पाण्याचा ठणठणाट! सोमवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; कोणत्या भागांना फटका?

वर्षा उसगांवकर यांचे पती कोण आहेत? सोशल मीडियावर एकही एकत्र फोटो का पोस्ट करत नाहीत? अभिनेत्रीने सांगितलं कारण!

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मिठी नदीजवळ नाल्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT