Kazi Gadhi Latest marathi news esakal
नाशिक

Nashik : काझी गढीवरील 3 घरांच्या भिंती कोसळल्या

युनूस शेख

जुने नाशिक : संततधारेमुळे (Rain) काझी गढीची माती मोठ्या प्रमाणावर धुतली गेली. काठावर असलेल्या बंद घरांच्या भिंतीचा आधार गेल्याने त्या खाली कोसळल्या (Collapsed). तीनही घरांमध्ये कुणी राहत नसल्याने सुदैवाने दुर्घटना टळली. काझी गढीचा बहुतांशी भाग धोकादायक झाला आहे. (walls of 3 houses on Qazi Gadhi collapsed Nashik latest Marathi News)

दरवर्षी पावसाळ्यात येथील घरांचा भाग कोसळण्याच्या घटना घडत असतात. काही रहिवाशांनी तेथून कायमस्वरूपी स्थलांतर केले आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, असे रहिवासी मात्र अद्यापही जीव मुठीत घेऊन वास्तव्यास आहे.

गढीची माती पावसाळ्यात धुतली जात असल्याने तो भाग धोकादायक होत असतो. अनेक वर्षांपासून रहिवासी संरक्षण भिंत बांधून देण्याची मागणी करत आहे. मध्यंतरी गढीस संरक्षण भिंत बांधण्याचे टेंडर निघाले आहे. त्यासाठी निधीही आला आहे.

असे वृत्त पसरल्याने रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यांचा हा आनंद क्षणभंगुर राहिला. अद्याप संरक्षण भिंत बांधण्याबाबत प्रत्यक्षात कुठलेही काम सुरू झालेले नाही. गढीच्या एका भागास अनेक वर्षांपूर्वी भिंत बांधण्यात आली आहे. मग दुसऱ्या भागाची भिंत बांधण्यास काय हरकत आहे. दोन्ही भागाच्या भिंतीसाठी वेगळे नियम कसे, असे प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT