16229
आर. डी. निकम
-----
पाणी चोरीस जबाबदार अधिकाऱ्यांचे
तातडीने निलंबन करावे : आर. डी. निकम
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १३ : गुगुळवाड (ता. मालेगाव) येथील पाझर तलावातून पाणी चोरी अद्यापही सुरु आहे. पाणीचोरी बंद व्हावी यासाठी भाजप क्रिडा आघाडीचे जिल्हाध्यक्ष आर. डी. निकम यांच्यासह ग्रामस्थांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन केले हाेते. मात्र, अद्यापही पाणी चोरी सुरूच असल्याने या घटनेस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी निकम यांनी केली. मागणीची दखल न घेतल्यास दोन डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
गुगुळवाड (ता. मालेगाव) येथील पाझर तलावातून पाणी चोरी अद्यापही सुरु आहे. पाणीचोरीमुळे गेल्या वर्षी संपुर्ण तलाव आटल्याने शेकडो क्विंटल मासे मृत झाल्याने गावात दुर्गंधी पसरली होती. पाझर तलावाला लागून काही शेतकऱ्यांनी बेकायदेशीर विहीरी खोदल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी पाझर तलावाच्या क्षेत्रात भराव टाकून जमिनी देखील तयार केल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीत तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता पाणी चोरी रोखण्यासाठी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने दिली. ही पाणी चोरी थांबावी म्हणून निकम यांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत ३ नोव्हेंबरला तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी येवून पाणीचोरी कायमस्वरुपी बंद करण्याचे व संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. असे असताना रात्री अपरात्री तलावातील सिंगल फेसद्वारे पाणीचोरी होत आहे. तहसील व पंचायत समितीचे कर्मचारी तलावावर पोहचण्याच्या आधीच पाणी चोरी करणाऱ्यांना सुगावा लागतो. त्यामुळे काही काळासाठी वीजपंप तेथून उचलून घेतले जातात. कर्मचारी परतल्यानंतर पुन्हा पाणीचोरी होत आहे. याबाबत ठोस कारवाई न केल्याने ८० टक्के तलाव रिकामा झाला आहे. त्यामुळे पाणी चोरीला जबाबदार असणाऱ्या तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. या मागणीसाठी २ डिसेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरु करण्याचा इशारा आर. डी. निकम यांनी मुख्यमंञ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.