Weather Forecast esakal
नाशिक

Weather Forecast : जिल्ह्यात आजपासून 5 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहर आणि परिसरात दुपारी ढगाळ हवामानासोबत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच, इगतपुरीच्या विभागीय कृषी केंद्रातर्फे बुधवारपासून (ता. १५) येत्या १९ मार्चपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Weather Forecast of light to moderate rain in district for 5 days from today nashik news)

या काळात हवामान ढगाळ राहणार आहे. जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारपर्यंत (ता. १६) विजांच्या कडकडाटासह वादळी आणि हलक्या ते मध्यम पाऊस अथवा गारपीट होण्याचा अंदाज केंद्राने वर्तवला आहे. या काळात कमाल तापमान ३३ ते ३४ आणि किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअस, तर वाऱ्याचा वेग तासाला ८ ते १३ किलोमीटर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामानाचा अंदाज आणि इशारा लक्षात घेता, स्थानिक हवामानाची स्थिती ओळखून शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची कापणीसह मळणी तत्काळ पूर्ण करायची आहे. कापणी केलेल्या पिकांना सुरक्षित जागेत अथवा ताडपत्रीने झाकून ठेवायचे आहे, हे स्पष्ट करत असताना केंद्राने पिकनिहाय काय काळजी घ्यायची याबद्दलचा सल्ला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: अमेरिकेसोबत मोदींचा आणखी एक करार? राफेलपेक्षा दुप्पट महाग विमानांची खरेदी

Ranji Trophy: मुंबईचं स्पर्धेतून बाहेर, तर जम्मू-काश्मीरने रचला इतिहास; सेमीफायनलचे चार संघ निश्चित, पाहा वेळापत्रक

Sindhudurg ZP : जिल्हा परिषदेत राजकीय स्थित्यंतर; पारंपरिक राजकारणाला छेद, काँग्रेस पहिल्यांदाच सभागृहातून हद्दपार

Beed News: पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं! १६०० मीटर धावण्यात भोवळ आली अन्...; भरती मैदानातच तरुणावर काळाचा घाला

PAN Card Rules : PAN नियमांमध्ये मोठे बदल! बँक, गाडी, लग्न खर्च आणि घर व्यवहारांमध्ये कुठे लागणार PAN, कुठे नाही? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT