ॲंकर
शहर टुडे पान तीनसाठी
-------------------
लग्नसराईच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग
--------
सोने-चांदीच्या दरातील चढ-उताराचा बजेटवर परिणाम; कपडे, भांडी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना पसंती
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : दिवाळीचा उत्साह ओसरताच आता लग्नसराईचे वेध लागले आहेत. तुळशी विवाहानंतर विवाह सोहळ्यांना सुरुवात होणार असल्याने शहरातील बाजारपेठेत लग्नाच्या खरेदीची लगबग वाढू लागली आहे. सोने-चांदीचे दागिने, कपडे, भांडी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व संसारोपयोगी साहित्य खरेदीचे नियोजन सुरू झाले आहे. मात्र, वाढती महागाई व सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उतारामुळे ग्राहकांकडून बजेटचा विचार करूनच खरेदी केली जात आहे.
लग्नसराईत सोनेखरेदीला विशेष महत्त्व असते. मुलीच्या लग्नासाठी दागिने खरेदी करण्याकडे कुटुंबांचा कल असतो. मात्र, सोन्याचे दर चढे असल्याने ग्राहक बाजार भावावर लक्ष ठेवून आहेत. काही जण आगाऊ दागिने निश्चित करीत आहेत, तर काही दर कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. चांदीच्या दरातील बदलाचाही खरेदीवर परिणाम होत आहे. दुसरीकडे, वधू-वरांचे पोशाख, साड्या, शेरवानी, डिझायनर लेहेंगा व नातेवाइकांसाठीच्या कपड्यांच्या खरेदीची तयारी सुरू झाली आहे.
.......
आवश्यक कापड्यांना प्राधान्य
लग्नातील विविध कार्यक्रमांसाठी वेगवेगळे पोशाख घेण्याऐवजी आवश्यक कपड्यांनाच प्राधान्य दिले जात आहे. नव्या संसारासाठी लागणारी भांडी, गॅस शेगडी, मिक्सर, कुकर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्ही आदी वस्तूंच्या खरेदीचेही नियोजन होत आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेताना कंपन्यांचे दर, वॉरंटी व सवलतींची तुलना केली जात आहे.
.......
कुटूंबाचे आर्थिक नियोजन
टिकाऊ व उपयोगी वस्तू खरेदी करण्याकडे मध्यमवर्गीय कुटुंबांचा कल दिसत आहे. लग्नसमारंभाचा वाढता खर्च, हॉल, जेवणावळ, सजावट, छायाचित्रण व दागिने अशा विविध बाबींचा ताळमेळ घालताना कुटुंबांना आर्थिक नियोजन करावे लागत आहे. त्यामुळे दिखाऊपणापेक्षा गरजेच्या वस्तू खरेदी करण्यावर भर दिला जात आहे.
.......
चांगल्या उलाढालाची अपेक्षा
ऑनलाइन व प्रत्यक्ष बाजारातील किमतींची तुलना करून खरेदी करण्याचे प्रमाणही वाढत आहे. दिवाळीनंतर लग्नसराईच्या हंगामामुळे सराफ, कापड, भांडी व इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिकांना चांगल्या उलाढालीची अपेक्षा आहे. आगामी काळात विवाह मुहूर्त जवळ येताच बाजारपेठेतील खरेदीला आणखी वेग येण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
-
......
कोट
लग्नसराई सुरू होत असल्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांना ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे. सोन्याचे दर जास्त असल्यामुळे ग्राहक गरजेनुसार व ठरवलेल्या बजेटमध्ये दागिने खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. काही ग्राहक हलके दागिने, तर काही पारंपरिक दागिन्यांची आगाऊ बुकिंग करीत आहेत.
- मिलिंद सोनार, सराफा व्यावसायिक, जळगाव.
.......
कोट
दिवाळीनंतर लग्नसराईच्या खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेत येऊ लागले आहेत. वधू-वरांचे कपडे, साड्या, डिझायनर लेहेंगा, शेरवानी यांसह नातेवाइकांच्या कपड्यांना मागणी आहे. ग्राहकांकडून किमती व डिझाइनची तुलना केली जात आहे. बजेटमध्ये चांगल्या दर्जाचे, आकर्षक कपडे मिळावेत, अशी ग्राहकांची अपेक्षा असून, आगामी दिवसांत खरेदीला अधिक वेग येईल.
- किशोर सोनी, व्यावसायिक, जळगाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.