Railway Station sakal
नाशिक

Lasalgaon Railway Station : कोरोनात बंद एक्स्प्रेस कधी सुरू होणार?

लासलगाव रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या तीन एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे बंद ;‘रेल्वे प्रशासन झोपेत आहे का’ असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

लासलगाव- कोरोनाच्या काळात बंद झालेल्या देवगिरी, जनता आणि शालिमार एक्स्प्रेसच्या थांब्याचे अद्याप पुनर्स्थापना न झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. लासलगाव रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या तीन एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे बंद केल्यामुळे व्यावसायिक, विद्यार्थी आणि प्रवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत. ‘रेल्वे प्रशासन झोपेत आहे का’ असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.

मनमाड-कुर्ला मार्गावर धावणारी गोदावरी एक्स्प्रेस सध्या धुळे येथून सुरू होत आहे. मात्र, ही गाडी धुळे-दादर एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी ती पूर्ववत मनमाडपासून सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे. स्थानिक प्रवासी संघटना, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत.

निर्णयामुळे फटका

लासलगाव स्थानकावर बंद करण्यात आलेल्या थांब्यांमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान आणि रोजंदारीवर अवलंबून असलेल्या रिक्षाचालकांचे हाल होत आहेत. अमृत भारत योजनेअंतर्गत लासलगाव रेल्वे स्थानकाचा झपाट्याने विकास होत असताना, कोरोनाकाळात बंद झालेल्या गाड्या अद्याप सुरू न झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.

कोरोना काळात बंद झालेल्या एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे पूर्ववत सुरू करण्यासाठी आम्ही रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. प्रवाशांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात. गरज भासल्यास प्रवासी संघटनेचे शिष्टमंडळ रेल्वेमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा करेल

-सुवर्णाताई जगताप, सामाजिक कार्यकर्त्या, लासलगाव

देवगिरी, जनता आणि शालिमार एक्स्प्रेसचे थांबे लासलगाव स्थानकावर पूर्ववत सुरू करावेत. या साठी रेल्वे मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा सुरू आहे.

-प्रकाश पाटील, अध्यक्ष, निफाड तालुका शिवसेना

लासलगाव स्थानकावर थांबे बंद झाल्याने प्रवासी, विद्यार्थी, आणि रिक्षाव्यवसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. पूर्वीचे थांबे सुरू करून गैरसोय दूर करावी.गोदावरी कुर्ला एक्स्प्रेस ही पूर्ववत मनमाड पासून सुरू करावी.

-राजेंद्र जाधव, अध्यक्ष, प्रवासी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्प यांचे एक वक्तव्य आणि शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1400 अंकांनी खाली; Indigo चे शेअर्स चर्चेत

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

SCROLL FOR NEXT