Cold wave in Nashik Record low temperature esakal
नाशिक

Winter Season : द्राक्षपंढरीला भरली हुडहुडी; यंदाच्या हंगामातील 8.5 नीचांकी पातळीवर तपमान

सकाळ वृत्तसेवा

निफाड (जि. नाशिक) : दोन दिवसांपासून वातावरणात बदल होत थंडी अचानक वाढल्याने द्राक्षपंढरीला कापर भरल असून, थंडीने या हंगामातील पहिला नीचांक गाठला आहे. तालुक्यातील कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रावर शुक्रवारी (ता. १८) ८.५ अंश या हंगामातील तापमानाची नोंद झाली. गोदा-कादवा विनता काठावर ऊसतोडीसाठी आलेल्या उसतोडडणी कामगारांबरोरच द्राक्ष मजुरांना थंडीचा प्रकोपाला सामोरे जावे लागत असून, अवघ्या द्राक्षपंढरीला हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. (Winter Season below 8 degrees lowest temperature of season this year in niphad Nashik News)

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे थंडीचे जोरदार आगमन होत असते. आधीच सलग चार महिने झालेल्या पावसाने खरिपाचे मातेर झाले आहे. मात्र रब्बीच्या अशा पल्लवीत झाल्या असल्यानी यंदाचे थंडीचे वातावरण पोषक ठरणार आहे. दरम्यान निफाडच्या ग्रामीण भागात नाशिक जिल्ह्यातील तसेच बाहेरच्या कारखान्यांचे मजूर मोठ्या संखेने डेरे दाखल झाले आहेत.

तसेच द्राक्षबागांच्या कामासाठी आलेला मजूर गाव तसे वाडी वस्तीवर रहात असल्यामुळे वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीची उब महत्त्वाची असल्यामुळे निफाडच्या ग्रामिण भागात शकोट्या पेटल्या आहेत आहेत. मात्र थंडीचा जोर असाच राहिल्यास द्राक्षपिकाला याचा फटका बसून द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मागील काही वर्षापासून विशेषता चार-पाच वर्षापासून थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात जाणवत आहे 2018 सालामध्ये 1.8° वरती तपमानची नोंद झाली होती त्यावेळेला कसबे सुकेने येथे पुदिनावरती दवबिंदू गोठले होते तर कारसुळ येथेही उसाच्या पाचटा वरील दवबिंदू गोठल्याचे अनुभूती निफाड करांना झाली होती दरवर्षी वाढती थंडी द्राक्ष पंढरीसाठी निश्चितच हुडहुडी भरणारी ठरते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT