Winter sakal
नाशिक

Winter Weather Update : वातावरणात गारवा अन् कमाल तापमानात वाढ!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून निर्माण झालेला गारवा वातावरणात टिकून आहे. असे असताना कमाल तापमानात चढ-उतार सुरु आहे. सध्या कमाल तापमान वाढून तीन अंश सेल्सिअसहून अधिक झालेले आहे.

गारठ्यामुळे मंगळवारी (ता.१७) नाशिकचे किमान तापमान ९.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर दिवसभर कडक ऊन पडल्‍याने कमाल तापमानात वाढ होऊन ३१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. (Winter Weather Update Cold atmosphere and increase in maximum temperature nashik news)

शीतलहरींमुळे पाऱ्यात घसरण होऊन नाशिकचे तापमान गेल्‍या काही दिवसांपासून खालावले होते. जिल्ह्यातील काही भागांमध्ये तर पाच अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान घसरलेले होते. तर कमाल तापमानातही घसरण होऊन २३ ते २४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद होत होती.

परंतु, सध्या सायंकाळनंतर वातावरणात कमालीचा गारवा जाणवत असला तरी दिवसाच्‍या वेळी प्रखर सूर्यकिरणांमुळे वाढीव पाऱ्याची नोंद होते आहे. आठवड्याभरात कमाल तापमानात सातत्‍याने चढ-उतार सुरुच आहे.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

शीतलहरींमुळे गारव्‍याची अनुभूती येत असल्‍याने सायंकाळनंतर जनजीवनावर परिणाम होतो आहे. मंगळवारी (ता.१७) नाशिकचे किमान तापमान ९.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसची नोंद झालेली आहे. यापूर्वी (ता.१६) किमान तापमान १०.५ अंश सेल्सिअस राहिले होते. तर कमाल तापमान ३० अंशांवर पोचलेले होते.

आरोग्‍याची काळजी घेण्याचा तज्‍ज्ञांचा सल्‍ला

सध्याचे वातावरण साथरोगांसाठी पोषक समजले जाते. त्‍यामुळे सर्दी पडसे, खोकला, अंगदुखी यांसारखे संसर्गजन्‍य आजार वाढण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्‍यामुळे आरोग्‍याची काळजी घेण्याचा सल्‍ला तज्‍ज्ञांकडून दिला जातो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT