bank fraud of private microfinance companies esakal
नाशिक

महिलांनो खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांपासून सावधान

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. अहमदनगर) : महानगरपालिका क्षेत्रात केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत गरीब व दारिद्र्य रेषेखालील महिलांना स्वावलंबी होण्यासाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रोत्साहीत केले जात आहे. महिला बचत गट हे मनपाअंतर्गत कार्यरत समुदाय संघटक व महिला आर्थिक विकास महामंडळ सहयोगीनी मार्फतच स्थापन केले जातात. स्थापनेनंतर तीन महिने पुर्ण होताच फिरता निधी दहा हजार व अंतर्गत कर्ज व्यवहारास मान्यता दिली जाते. दरम्यान बचत गटांची संधी साधून काही खासगी मायक्रो फायनान्स कंपन्या मनपाचेच बचत गट असल्याचे सांगून फसवणूक करीत आहेत. संबंधितांपासून महिलांनी सावध रहावे, असे आवाहन उपायुक्त राहुल पाटील यांनी केले आहे.

मनपा बचत गटांना व्यवसाय करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेच्या मार्फत कर्ज पुरवठा हा वार्षिक ४ टक्के व्याज दराने केला जातो. सदरचे लाभ फक्त समुदाय संघटक व महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत सहयोगीनींच्या मार्फतच दिला जातो. अन्य कोणत्याही व्यक्ती महिलांचा यात संबंध नाही. शहरात मोठ्या प्रमाणावर अनेक खासगी मायक्रो फायनान्स कंपन्या मनपा कर्मचारी असल्याचे सांगून बचत गट तयार करत आहेत. हे बचत गट नोंदणीकृत नाहीत. या गटांना कोणताही शासकीय लाभ अथवा अनुदान नाही. संबंधित गट फक्त कर्ज वाटप करून त्यावर भरमसाट व्याज आकारणी करत सक्तीने कर्ज वसुली करतात. कोणतीही सुट अथवा सवलत दिली जात नाही. या बाबी निदर्शनास आल्याने मनपा प्रशासनातर्फे महिलांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मनपा बचत गटाच्या माहितीसाठी महिलांनी प्रभाग कार्यालय अथवा समुदाय संघटक व महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे'; राज ठाकरेंची टीका

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT