nashik muncipal corporation  sakal
नाशिक

नाशिक : कामे सुचविण्यासाठी जि. प. सदस्यांना डेडलाइन

पंधरावा वित्त आयोग

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : १५ व्या वित्त आयोगातून २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाकडून रेटा लावला जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्षांनी सदस्यांना कामे सुचविण्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले असून, त्यासाठी २५ जानेवारीपर्यंत डेडलाइन दिली आहे.

जिल्हा परिषदेला २०२१-२२ या आर्थिक वर्षात बंधित व अबंधित असा अनुक्रमे साडेसात कोटी व साडेचार कोटी म्हणजेच एकत्रित १२ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. सदस्यांचा कार्यकाळ आता केवळ दोन महिने उरला असल्याने या निधीचे नियोजन होऊन सदस्यांनी सुचवलेली कामे मार्गी लागावीत म्हणून प्रशासनाकडून रेटा सुरू आहे. कारण, प्रस्ताव आल्यानंतर त्यापुढील सर्व कागदपत्र, नियोजन, आराखडा, निविदाप्रक्रिया करण्यासाठी लागणारा अवधी लक्षात घेता प्रशासन आता प्रस्तावासाठी आग्रही आहे. निधीचे कामांसाठी समान वाटप झाल्यास प्रत्येक सदस्याला साधारणपणे १६ लाख रुपये मिळणार आहेत.

सदस्यांची होणार धावपळ

१५ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीसाठी सदस्यांनी २५ जानेवारीअखेर कामांचे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी पदाधिकारी, सदस्यांसोबत बैठकीनंतर घेतला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रस्ताव सादर करण्यास सदस्यांना अवघे दोनच दिवस मिळणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांची धावपळ होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT