World Cup 2023 sachin gite made World Cup Replica Gold Locket and Chain nashik news esakal
नाशिक

World Cup 2023: वर्ल्डकपच्‍या प्रतिकृतीचे 5 तोळ्यांचे लॉकेट-चेन; क्रिकेटप्रेमी सचिन गिते यांचा अनोखा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

World Cup 2023: अहमदाबाद येथे खेळविला जाणार असलेल्या विश्वकरंडकाचा अंतिम सामना थेट स्‍टेडियममध्ये जाऊन पाहण्याची प्रत्‍येक भारतीयाची इच्‍छा आहे.

पण तिकिटांच्‍या दरामुळे व उपलब्‍धतेअभावी प्रत्‍येकाला ही बाब शक्‍य नाही. मग क्रिकेटविषयीचे प्रेम व्‍यक्‍त करण्यासाठी अनोख्या शक्‍कल लढविल्‍या जात आहेत. (World Cup 2023 sachin gite made World Cup Replica Gold Locket and Chain nashik news)

विश्वकरंडकाचा उत्‍साह शिगेला पोचलेला असताना, सर्वत्र क्रिकेटमयी वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्‍येक जण आपापल्‍या स्‍तरावर व पद्धतीने भारतीय संघाला पाठबळ देत आहे. बहुतांश क्रीडाप्रेमींकडून अहमदाबादला जाऊन सामन्‍याचा थरार अनुभवण्याचा प्रयत्‍न सुरू आहे.

प्रत्‍येक जण आपापल्‍या पद्धतीने विश्वकरंडकाचा आनंद घेत आहेत. सचिन गिते यांनी आपले क्रिकेटप्रेम अनोख्या पद्धतीने व्‍यक्‍त केले आहे. त्‍यांनी विशेष ऑर्डर करून विश्वकरंडकाच्‍या प्रतिकृतीचे लॉकेट आणि चेन बनवून घेतली आहे. पाच तोळ्याची ही चेन लक्षवेधी ठरते आहे.

विश्वकरंडकाचा महाअंतिम सामना बघा मोफत भव्य स्क्रीनवर

भारत-ऑस्ट्रेलिया विश्वकरंडकाचा रविवारी (ता. १९) होणार महाअंतिम सामना कॉलेज रोड, बिग बाजार चौक येथे भव्य स्क्रीनवर नाशिक यूथ फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष योगेश चव्हाणके व मित्रपरिवार यांच्या संकल्पनेतून आयोजित केला आहे.

नाशिककरांना सामन्याचा आनंद घेता यावा व प्रत्येक नाशिककराने हा सामना संघटित भावनेने बघावा, हा या मागचा हेतू आहे. सर्व नाशिककराना हा सामना बघण्याची संधी नाशिक यूथ फाउंडेशनने उपलब्ध करून दिली आहे. तरी सर्वांनी सामन्याचा आनंद घ्यावा, असे आव्हान फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

Hindu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

SCROLL FOR NEXT