नाशिक

संजीवनीच्या यश नन्नावरेची तैवानमध्ये इंटर्नशीपसाठी निवड..! संपुर्ण खर्च विद्यापीठच उचलणार,तैवानला इंटर्नशिपला जाणारा यश ७६ वा विद्यार्थी

CD
पान-४ सेकंड मेन (कृपया आवश्यक/कॉमनला घ्यावी... 16 पाव पेज जाहिरातींचे पॅकेज आहे..) फोटो ओळी-27528 कोपरगाव : यश नन्नावरे याचा पालकांसह सत्कार करताना संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे. शेजारी डाॅ. कापगते, डाॅ. जावळे व डाॅ. गवळी. ‘संजीवनी’च्या यश नन्नावरेची तैवानमध्ये इंटर्नशीपसाठी निवड संपूर्ण खर्च विद्यापीठच उचलणार; इंटर्नशिपला जाणारा यश ७६ वा विद्यार्थी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ : कोपरगाव येथील संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी यश संजय नन्नावरे याची तैवानमधील दायेह विद्यापीठात दोन महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली असून, तो तैवानला रवाना झाला आहे. या कालावधीत तो डॉ. सिन-लियांग ओऊ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग फॉर मेडिकल डिव्हाइस’ या विषयावर संशोधन कार्य करणार आहे. यशच्या प्रवास, निवास आणि भोजनाचा संपूर्ण खर्च दायेह विद्यापीठच करणार आहे. तैवानला इंटर्नशिपला जाणारा यश हा ७६ वा विद्यार्थी आहे. यशला मिळालेल्या संधीबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी त्याचे व पालकांचे अभिनंदन केले. संजीवनी विद्यापीठाचे अध्यक्ष तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या हस्ते यश आणि त्याचे वडील संजय नन्नावरे, आई उज्ज्वला नन्नावरे यांचा सत्कार झाला. डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, डीन ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स डॉ. महेंद्र गवळी, विभागप्रमुख डॉ. माधुरी जावळे उपस्थित होते. ‘संजीवनी’च्या इंटरनॅशनल रिलेशन्स विभागामार्फत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये इंटर्नशिप आणि संशोधनाच्या संधी मिळाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. यापूर्वीही विद्यार्थ्यांना रशिया, तैवान, कॅनडा, फिलिपाइन्स, ट्युनिशिया, युनायटेड किंगडम इत्यादी ठिकाणच्या नामांकित विद्यापीठांत इंटर्नशिपची संधी मिळाली आहे. या वेळी यशने माझ्या यशात आई-वडील आणि संजीवनीतील शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ............... कोट ‘संजीवनी’च्या विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये इंटर्नशिपच्या संधी मिळणे ही संस्थेच्या गुणवत्तापूर्ण आणि कौशल्याधारित शिक्षणपद्धतीची पावती आहे. ‘संजीवनी’त विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असून, भविष्यातही जगातील नामांकित विद्यापीठांशी सहकार्य वाढवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होणार आहेत. -अमित कोल्हे, अध्यक्ष, संजीवनी विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल, तरी ४६३ किमी धावली; रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, नेमकं काय घडलं?

''आता सेल्फी पोस्ट केली की...''; PM मोदींच्या 'त्या' विधानावरून CJP ची उपरोधिक टीका, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : अमित शाह यांची मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Tiruchendur Soorasamharam 2026 : समुद्रकिनाऱ्यावर लाखोंचा जनसागर, ४,१०० पोलिसांचा कडेकोट पहारा! दक्षिण भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिरात रंगला ऐतिहासिक सोहळा

Solar Stock To Buy : ६ महिन्यांत ३३% परतावा! आता थेट ₹५०० पर्यंत झेप घेणार 'हा' सोलार शेअर; ब्रोकरेज फर्मचा मोठा सल्ला

SCROLL FOR NEXT