Students of Sandeep University performing miming (silent play) at the 'Sakaal Yin' art festival on Friday.
Students of Sandeep University performing miming (silent play) at the 'Sakaal Yin' art festival on Friday.  esakal
नाशिक

YIN Art Festival : तरुणाईच्या अभिनय क्षमतेचा मूक अभिनय स्पर्धेत कस

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुखावाटे एकही शब्द न उच्चारता केवळ अभिनयाच्या माध्यमातून आपला संदेश समाजापर्यंत पोचविण्याच्या अतिप्राचीन लोककलेत आम्हीदेखील पारंगत आहोत, असा संदेश तरुणाईने आपल्या कसदार अभिनयातून दिला. त्यांच्या या दांडग्या क्षमतेला प्रेक्षकांनीही तितकाच उदंड प्रतिसाद दिला अन्‌ त्यातून संपूर्ण सभागृहात जेव्हा फक्त टाळ्यांचा कडकडाटच ऐकायला मिळतो, तेव्हा संचारणारा उत्साह कसा असतो, याचा अनुभव शुक्रवारी (ता. ११) ‘मविप्र’च्या आयएमआरटी महाविद्यालयाच्या इमारतीत आला. (YIN Art Festival Mime acting competition Nashik news)

‘सकाळ यिन’ कला महोत्सवात शुक्रवारी मायमिंग (मूकनाट्य) सादरीकरण करताना के. के. वाघ महाविद्यालयाचे विद्यार्थी.

‘सकाळ-यिन’ कला महोत्सवात अन्य स्पर्धांसोबतच आयएएमआरटी सभागृहात मूक अभिनय स्पर्धा सुरू होती. त्या वेळी या सभागृहामधून फक्त आणि फक्त टाळ्यांचा कडकडाटच ऐकू येत होता. या स्पर्धेत नानाविध सामाजिक विषयांवर आधारित संदेशांचे सादरीकरण करताना तरुणाईने आपल्या अभिनय क्षमतेची चुणूक तर दाखवलीच. त्याचबरोबर या अतिप्राचीन लोककला प्रकाराला तरुणाईने आजही जपले असल्याचा भावदेखील अत्यंत कसदार अभिनयाद्वारे प्रदर्शित केला.

विशेष म्हणजे, आजच्या संवाद हरवलेल्या काळात सोशल मीडियासारख्या माध्यमांमुळे मूक अभिनय हा कलाप्रकार तरुणाईला जरा जास्तच भावतोय की काय, अशी शंका घेण्यासही वाव मिळू नये, याचीदेखील स्पर्धकांनी पुरेपूर काळजी घेतल्याचे या स्पर्धेतून दिसून आले.

कारण कुठल्याही संवादाशिवाय केवळ हावभाव, मुद्राभिनय आणि देहबोलीच्या माध्यमातून एखादा सामाजिक संदेश देत समाज जागृती करण्याची ही कला अगदी जातिवंत कलाकाराच्याही अभिनय क्षमतेचा कस पाहणारी असते, असे असतानाही तरुणाईने अत्यंत उत्साह आणि कसदार क्षमतेच्या आधारे या स्पर्धेत उत्साहपूर्वक सहभाग नोंदविला. त्यामुळे सहभागी सर्वच कलाकार कौतुकास पात्र ठरले. रंगकर्मी थिएटर्स ॲकॅडमीचे संचालक जयदीप पवार परीक्षक होते.

"सळसळतं चैतन्य आणि दांडगा उत्साह म्हणजे तरुणाई. त्यात ते कलावंत असतील, तर तो उत्साह काही औरच..! अशा उत्साही कलावंतांना हक्काचा मंच उपलब्ध करून देणारा हा यिन कला महोत्सव खरोखरच स्तुत्य उपक्रम म्हटला पाहिजे. अशा महोत्सवातून उद्याचे मोठे कलावंत घडण्याचा पाया रोवला जात असतो, या उक्तीची प्रचीती येथील कलाकारांचे सादरीकरण बघून आली." -जयदीप पवार, परीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT