नाशिक

अन् तरुणाने बांधल्या 'किन्नर'शी रेशीमगाठी! एका आगळ्यावेगळ्या लग्नाची चर्चा

अमोल खरे

मनमाड (जि.नाशिक) : आपण अनेक लग्ने बघितली असतील, पण मनमाडमध्ये एका वेगळ्या रेशीमगाठीची चर्चा होत आहे, ती म्हणजे, एका तृतीयपंथीयाच्या लग्नाची. मनमाड शहरातील किन्नरने लग्न करून येवला तालुक्यातील सूनबाई होण्याचा मान मिळविला आहे. अगदी नववधूचे जसे सासरी स्वागत केले जाते, अगदी तसेच स्वागत किन्नरचे करण्यात आले. (young-man-married-transgender-manmad-nashik-marathi-news)

त्या तरुणाची वधू मुलगी नसून एक 'किन्नर'!

लग्न हे साताजन्माची गाठ म्हटली जाते. मात्र या अनोख्या लग्नात वधू मुलगी नसून किन्नर आहे. किन्नरांच्या महंत समजल्या जाणाऱ्या महंत शिवलक्ष्मीने साध्या रीतिरिवाजाप्रमाणे मनमाडजवळील नागापूरच्या प्राचीन नागेश्वर महादेव मंदिरात येवल्याच्या मातुलठाण येथे राहणाऱ्या संजय झाल्टे या सुशिक्षित तरुणाशी विवाह केला. या लग्नसोहळ्याला परिवारातील मोजके लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे दोन्ही कुटुंबांनी वर-वधूच्या इच्छेला मान देत हे लग्न पार पाडले. महंत शिवलक्ष्मी व संजयच्या प्रेमकहाणीची आणि साताजन्माची गाठ पडायची कथाच वेगळी आहे. महंत शिवलक्ष्मी व संजयची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. या दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही. समाज काय म्हणेल याकडे लक्ष न देता या दोघांनी लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला. समाजसंकेत झुगारून या विवाहाला समाज कितपत स्वीकारेल, याची दोघांनाही भीती नव्हती. कुटुंबीय होकार देतील का याची मात्र चिंता होती. प्रेमासाठी दोघांनीही आपल्या कुटुंबांची संमती मिळविली. दोघेही रेशीमगाठीत बांधले गेले.

नववधूप्रमाणे रीतिरिवाज

अगदी नववधू-वराप्रमाणे लक्ष्मीचे सासरी म्हणजे येवला तालुक्यातील मातुलठाण येथे घरी स्वागत करण्यात आले. पती-पतीप्रमाणे संसार करण्याचे स्वप्न हे नवदांपत्य पाहत आहे. विशेष म्हणजे हा विवाह सोहळा आगळावेगळा जरी असला तरी रीतसर सर्व धार्मिक विधी करण्यात आले. नववधू आता पहिले मूळ लावून येवला येथे माहेरी नांदायला गेली आहे. संजयच्या कुटुंबाने समाजाचा विचार न करता महंत शिवलक्ष्मीला सून म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या लग्नाची चर्चा जिल्ह्यात होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arijit Singh Retirement : अरिजीत सिंहचा मोठा निर्णय! ‘Playback Singing’ मधून अचानक ‘रिटायरमेंट’ ; लाखो चाहत्यांना धक्का

Pune Tax Hike: निवडणूक झाली, आता पुणेकरांचा प्रॉपर्टी टॅक्स वाढणार! 'एवढ्या' करवाढीचा प्रस्ताव; 10 वर्षांपासून झाली नाही वाढ

Pune Water Supply: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! दुरुस्तीच्या कामामुळे 'या' दिवशी शहराचा पाणीपुरवठा बंद

CM Yogi Adityanath : उत्तर प्रदेशातील शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून गौरव

Himachal Pradesh Loyal Dog Video : ...अन् ‘हे’ मन हेलावणारं भावनिक दृश्य पाहून, बचाव पथकाच्या डोळ्यातही आलं पाणी!

SCROLL FOR NEXT