Parshuram Najan esakal
नाशिक

Nashik Crime News : नाशिकच्या सिडकोभागात मारहाणीत तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : पाच दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी आलेल्या संशयितांनी दोन तरुणांना केलेल्या मारहाणीत एका २४ वर्षीय तरुणाचा डोक्यात पेवर ब्लॉक टाकून खून केल्याची घटना आज रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान सावता नगर परिसरात घडली. (young man was beaten to death in Cidco of Nashik Nashik Crime News)

परशुराम बाळासाहेब नजान (वय २४) हा तरुण आज (ता.२५) सावता नगर येथील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी अल्पवयीन मित्रासोबत आला होता. त्याच्या सोबत असलेल्या मित्राचे आणि संशयितांचे चार ते पाच दिवसांपूर्वी भांडण झाले होते.

त्याची कुरापत काढून सुमारे तीन ते चार संशयितांनी परशुराम व त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरवात केली. परशुराम प्रतिकार करीत असताना संशयितांनी हॉटेलच्या बाहेर पडलेल्या पेवर ब्लॉक त्याच्या डोक्यात टाकल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले.

जखमी परशुराम यास मित्रांनी जवळच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र अतिरक्तस्रावामुळे त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना परशुरामचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

या घटनेची माहिती समजताच अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली, पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक निरीक्षक किशोर कोल्हे, सहाय्यक निरीक्षक वसंत खतेले, उपनिरीक्षक संदीप पवार आदींसह पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

परिस्थिती नियंत्रणात आणत पंचनामा केला. या घटनेतील चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.

सिडको परिसरात भीतीचे वातावरण

गेल्या काही दिवसापूर्वी अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राकेश कोष्टी याच्यावर भर दिवसा गोळीबार झाल्याने गॅंगवॉर वाढल्याचे दिसून आले आहे.

त्रिमूर्ती चौक परिसरामध्ये हरवलेला मोबाईल परत देण्यासाठी गेलेला युवकाला मारहाण झाल्यानंतर त्याचाही मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना सावता नगर येथे घडलेल्या प्रकारामुळे सिडको परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike: दिवाळीच्या आधीच महागाईचा तडाखा; एलपीजी गॅसचे दर वाढले, तुमच्या शहरात किती झाली किंमत?

Latest Marathi News Live Update : पिकाचा पंचनामा करताना तलाठ्याला सर्पदंश

Video: अन् त्याने जोरात आईला ओढलं; तीन वर्षांच्या चिमुकल्याने पाच सेकंदात वाचवला आईचा जीव

Kids Health: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत आरोग्याचा गंभीर धोका 'या' समस्या उद्‍भवण्याचा तज्ज्ञांचा इशारा

Shivaji Maharaj Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रिझर्व बँक पाहिली का? व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT