wedding esakal
नाशिक

..अन् आमचं लग्नही ठरेना! नोकऱ्या गमावलेल्या तरूणांच्या व्यथा

एस.डी.आहीरे

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : गेल्या वर्षीच आमच्या राजूच्या लग्नाचा (wedding) बार उडवायचा होता, पण कोरोना (corona) आला अन त्याची नोकरी गेली. काही कामधंदा नसल्याने घरीच आहे तो आता. राजूचं लग्न काही जुळेना, यंदा तरी दोनाचे चार हात होतील अस वाटत होत. पण पुन्हा कोरानाचा भडका उडाला. अशा व्यथा कोकणगांव (ता.निफाड) येथील निफाडे दाम्पत्य सांगत होते. असाच काहीसा सूर उपवर मुलांच्या आई-वडिलांकडून ऐकू येत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे मुलांची लग्न जुळणे कठीण झाले आहे.

यंदा तरी दोनाचे चार हात होतील अस वाटत होतं.

कोरोनामुळे आर्थिक परिणाम समाजवर झालाच आहे. पण दोन जिवांच्या रेशमी गाठी जुळण्यालाही त्याने बाधा आणली आहे. पोराला नवरी शोधण्यासाठी पालकांना गावोगावी, पाहुण्याकडे फिरावे लागत आहे. तरूणांची विवाहगाठ बांधणे ही आता मोठी समस्याच बनली आहे. कोरोनुमुळे नोकरी गेल्याने शहरातून परतलेल्या तरूणांची स्थिती बिकट आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे छोटी-मोठी नोकरी करणाऱ्या या तरूणांवर बेरोजगाराची कुर्हाड कोसळली आहे. याचा परिमाण तरूणांच्या लग्नावर झाला आहे.

पालकांनाही नैराश्‍येचा सामना

प्रत्येक आई-वडिलांना आपली मुलगी सधन कुटुंबात जावी, अशी अपेक्षा असते. मुलगी व पालक हे नोकरी असलेल्या मुलांना अधिक पसंती देतात. महिन्याला खात्रीशिर उत्त्पन्न असा त्यामागील हेतू असतो. टाळेबंदीत अनेक तरूणांच्या हातच्या नोकऱ्याच गेल्याने मुलीकडून नकाराला सामोरे जावे लागते. या समस्यामुळे मुलांसहित पालकांना ही नैराश्‍यचा सामना करावा लागत आहे.

मुलगा नोकरदारच हवा

गेल्या वर्षी शहरातून गावात आलेले काही तरूण पुन्हा शहरात परतले. पण कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता परत नोकरी जाणार का, असा प्रश्‍न त्यांच्या समोर आहे. नोकरीच्या अनिश्‍चितमुळे बरेच युवक खेड्यातच रमले आहेत. शेती किवा अन्य व्यवसाय करतात. परंतु नोकरदारच मुलगा हवा या अटीमुळे तरूणांची लग्न जुळणे कठीण झाले आहे.

शेतकरी नवरा नको गं बाई...

निफाड तालुका तसा द्राक्षशेतीसह बागाईदाराचा परिसर ओळखला जातो.पण द्राक्षाचे बेभरवशाचे उत्त्पन्न,कारखाने बंद असल्याने ऊसाची परवड यामुळे बागाईतदार ही बिरूदावली आता नावालाच राहीली आहे.पुर्वी निफाड मध्ये मुलगी देणे म्हणजे प्रतिष्ठेचे समजले जायचे.आता मात्र शेतकरी नवरा नको ग बाई...अशी स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT