nilesh-lanke  esakal
नाशिक

आमदार नीलेश लंकेंच्या वकृत्वावर तरूणाई फिदा!

दिपक आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : ते आले, त्यांनी पाहिले...अन जिंकून गेले, या ओळीचा प्रत्यय पिंपळगाव बसवंत शहरात दिवाळीच्या पूर्वसंध्येला आला. कोविड (Covid-19) काळात हजारो नागरिकांचे प्राण वाचवून देवदूत ठरलेले पारनेरचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) हे आज येथे एका कार्यक्रमाप्रसंगी आले होते. त्यांचे जल्लोषात, फटाक्याची आतषबाजी यासह अगदी मंत्र्याचेही स्वागत फिके पडावे अशा पद्धतीने तरूणांनी त्यांचे स्वागत केले. तरूणाईमध्ये आमदार लंके यांची क्रेझ पाहता दोन तासांच्या दौऱ्यात त्यांनी अनेकांची मने जिंकली.

तरूणाईची मने जिकुंन गेले आमदार लंके

कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत कोविड सेंटरमधून हजारोंना जीवनदान देत आमदार लंके यांचे सामाजिक कार्य सर्वदूर पोहचले. आमदार लंके आज अनौपचारिकपणे उद्घाटनाला आले. आमदार दिलीप बनकर यांनी स्व. बनकर पतसंस्था, पिंपळगांव बाजार समिती तर पंचायत समिती सदस्य राजेश पाटील यांनी संपर्क कार्यालयात त्यांचे स्वागत केले. मालक रेडीमेडमध्ये साहिल लोखंडे, साधना मिसळ येथे ॲड. गितेश बनकर यांनी स्वागत केले. आमदार लंके यांची साधी राहणी, ग्रामीण ढंगातील वतृत्व यामुळे उपस्थितांना ते अधिकच भावले. आमदार बनकर यांच्या कार्याचा गौरव त्यांनी केला. गावरान ढंगातील त्यांच्या शाब्दीक फटकेबाजीला उपस्थित तरूणांनी जोरदार टाळ्या, शिट्ट्यांनी दाद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : खिशात नाही दाणा अन्... ! Mumbai Indians च्या खेळीने सारे चक्रावले; CSK च्या रणनीतीने KKR चा खिसा कापला...

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र घटले, मका २७० हेक्टरने लागवड वाढली

दिग्पाल लांजेकरांच्या श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प भेटीला; महाराजांची आग्रा स्वारी दिसणार, चित्रपटाचं नाव काय?

Maharashtra Politics: काँग्रेसचा मोठा नेता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर? पालिका निवडणुकीआधी राजकीय भूकंपाचे संकेत

Hasan Mushrif : ‘आम्ही केलं; आता जबाबदारी तुमची’ शेंडा पार्क वैद्यकीय नगरीत मंत्री हसन मुश्रीफ यांचा ठाम संदेश

SCROLL FOR NEXT