Prime Minister Narendra Modi tour planning meeting esakal
नाशिक

Nashik Narendra Modi : साधुग्रामच्या जागेवरच युवा महोत्सव; गिरीश महाजन यांच्याकडून जागेची पाहणी

राष्ट्रीय युवक महोत्सवानिमित्त देशभरातून नाशिकमध्ये येणाऱ्या आठ ते दहा हजार युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Narendra Modi : राष्ट्रीय युवक महोत्सवानिमित्त देशभरातून नाशिकमध्ये येणाऱ्या आठ ते दहा हजार युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.

त्यासाठी पंचवटीतील साधुग्रामची जागा निश्चित झाली असून, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (ता. २९) या जागेची पाहणी करत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.(Youth festival on site of Sadhugram at panchavati nashik narendra modi news)

राष्ट्रीय युवक महोत्सव १२ जानेवारीला नाशिकमध्ये होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, त्यांची वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. त्यांच्या वेळेनुसार व्यवस्थापनात बदल केले जातील. त्यादृष्टीने मंत्री महाजन यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष साधुग्रामच्या जागेला भेट दिली.

यावेळी आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर, माजी स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके आदी उपस्थित होते.

युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या युवकांच्या भोजनाची, राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महोत्सवाच्या ठिकाणी पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात येतील. त्यातून नाशिकचे ब्रॅन्डिंग करण्यासाठी ‘एमटीडीसी’च्या माध्यमातून ‘कॉफी टेबल बुक’ तयार करण्याचे आदेश मंत्री महाजन यांनी दिले.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना नियोजनात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी थेट मंत्री महाजन यांनी चर्चा केली. युवक महोत्सवातून देशात महाराष्ट्राचे नाव उंचावेल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची हजेरी

नाशिकमध्ये १२ ते १६ जानेवारीदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्‍घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. समारोपाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १६ जानेवारीला उपस्थित राहणार आहेत.

आयुक्त राधाकृष्ण गमे गैरहजर

मंत्री महाजन यांनी साधुग्रामची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या वेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना थेट मंत्री महाजन यांनी फोन करून अनुपस्थितीबाबत विचारणा केली. आपल्याला माहिती नसल्याचे गमे यांनी सांगितले. यापुढे महोत्सवाच्या कार्यक्रमात लक्ष घालण्याचे आदेशही महाजन यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : धावपट्टीला स्पर्श करताच विमानाने घेतले पुन्हा हवेत उड्डाण

Kolhapur Crime : एक कोटी दे, मग बांधकाम कर; बिल्डरचं अपहरण, संशयिताने लढवलेली महापालिकेची निवडणूक

SCROLL FOR NEXT