bike rider killed in accident
bike rider killed in accident  esakal
नाशिक

Nashik: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे बेतले जिवावर; वाहनाच्या धडकेत युवक ठार

नरेश हाळणोर

नाशिक : मुंबई - आग्रा महामार्गावर दुचाकी, रिक्षा या लहान वाहनांना वाहतुकीची परवानगी नसताना, त्याचे उल्लंघन करणे बुलेटस्वाराच्या जीवावरच बेतले. अज्ञात भरधाव वेगातील वाहनाने बुलेटला पाठीमागून धडक दिली. यात बुलेटवर चालकाच्या मागे बसलेल्या युवकाचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यु झाला तर बुलेटस्वारही जखमी झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (youth on bullet killed in collision with vehicle Nashik Latest Marathi News)

मुंबई-आग्रा महामार्गाच्या पंचवटी कॉलेजसमोरील उड्डाणपुल सदरचा अपघात झाला. शुभम रामगोपाल पांडे (२५, रा. समाज मंदिरामागे, महालक्ष्मीनगर, अंबड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तेजस भिकाजी राणे (रा. कृष्णनगर, कामटवाडे, नाशिक) याच्या फिर्यादीनुसार, पांडे व राणे हे दोघे गेल्या शनिवारी (ता.८) रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास बुलेटने (एमएच १५ एफपी २२९१) महामार्गाच्या उड्डाणपूलावरून प्रवास करीत होते.

त्याचवेळी द्वारकाकडून आडगावच्या दिशेने आलेल्या भरधाव वेगातील वाहनाने पंचवटी कॉलेज समोरील उड्डाणपूलावर बुलेटला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोघेही मित्र गंभीर जखमी झाले होते. मात्र, यात पांडे हा गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक माळी तपास करीत आहेत.

नियमांचे उल्लंघन जीवावर बेतले

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गेल्या शनिवारी (ता.८) पहाटेच्या सुमारास नाशिक-औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौफुलीवर ट्रक व खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. यात १२ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यु झाला. सदरची घटनाही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे घडली. दोन्हीही वाहनचालकांनी चौफुलीवर वाहनाचा वेग मर्यादित करून मार्गक्रमण केले असते तर कदाचित अपघात टाळता आला असता.

त्याचप्रमाणे, मुंबई-आग्रा महामार्गावर दुचाकी, रिक्षा या लहान वाहनांना परवानगी नाही. तसे फलकही लावण्यात आलेले आहेत. तरीही दररोज शेकडो दुचाकीस्वार हे उड्डाणपुलावरून प्रवास करतात. यातून यापूर्वीही अपघात झाले असून, त्यात याही अपघाताची भर पडली. मात्र यातून एका २५ वर्षीय युवकाचा हकनाक बळी गेला. वाहतूक नियमांचे पालन केले असते तर कदाचित त्याच्या जीवावर बेतले नसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: ईडीच्या अटकेबाबत केजरीवालांच्या बाजूनं निकाल येणार का? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर, योगेंद्र यादव यांनी दिलं उत्तर

परराष्ट्र मंत्रालयाकडून लाओस, कम्बोडियाला जाणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी; काय आहे कारण?

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

Latest Marathi News Live Update : रायबरेलीतील सभेत बोलताना सोनिया गांधी भावुक

SCROLL FOR NEXT