murder
murder esakal
नाशिक

Nashik Crime News : बहिणीची छेड काढल्याच्या वादातून खून

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : बहिणीची छेड काढल्याच्या वादातून बुधवार (ता.२२) रोजी निलगिरी बागेत राहणाऱ्या एका युवकाचा (Youth) धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. (youth was stabbed to death with sharp weapon due to dispute over teasing his sister nashik crime news)

याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याप्रकरणी संशयित युवकाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद रोडवरील निलगिरी बाग येथे राहणारा विकास नलावडे (वय २५) हा संशयीताच्या बहिणीची नेहमी छेड काढत होता. याहून संशयित साळवे व नलावडे यांच्यात वाद यापूर्वी वाद देखील झाले होते.

बुधवार (ता.२२) रोजी रात्री साडे नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान नलावडे याने संशयित साळवे यास निलगिरी बाग येथील बिल्डिंग न.५ जवळ असलेल्या पटांगणात भेटावयास बोलावले आणि मीच तुझ्या बहिणी सोबत लग्न करेन, असे सांगितले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

यात संशयित अमोल साळवे (वय २७, रा.निलगिरी बाग, औरंगाबाद रोड) यास राग आला.त्याने धारधार शस्त्राने वार केला यात विकास रक्ताच्या थारोळ्यात पडला. एका सुजाण नागरिकाने विकास यास लागलीच डॉ वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले.उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, या प्रकरणी संशयित अमोल साळवे याचे सह दोघांना ताब्यात घेतले आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.

यांनी बजाविली कामगिरी

आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर,पोलिस उपनिरीक्षक अशोक पाथरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक भास्कर वाढवणे, पोलिस हवालदार सुरेश नरोडे,पोलिस नाईक गणेश देसले,

निलेश काटकर,दादासाहेब वाघ,देवराज सुरंजे,पोलिस अंमलदार दिनेश गुंबाडे,सचिन बाहिकर,अमोल देशमुख, गणेश माळी यांनी तपासाचे चक्रे फिरवत संशयितासह दोघांना ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT