Ashima Mittal studying from the students of Zilla Parishad school here.
Ashima Mittal studying from the students of Zilla Parishad school here. ewsakal
नाशिक

Nashik News : अधिकाऱ्यांमधील शिक्षक; नांदगाव तालुका दौऱ्यात सीईओंकडून शाळेस भेट

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव (जि. नाशिक) : शाळा सुरु असतानाच मोठ्या मॅडम वर्गात आल्या. त्यांनी आल्या आल्या मुलांचा क्लास घेत गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज याबाबत मुलांची आकलन क्षमता तपासली. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्‍न विचारले. विद्यार्थ्यांनी देखील हजरजबाबी होत उत्तरे दिली. यानंतर मुलांच्या गुणवत्तेची खात्री पटलेल्या मॅडम यांनी देखील मग तेवढ्याच मोकळ्या मनाने मुलांचे कौतुक केले. (ZP CEO Ashima Mittal visit to school by during Nandgaon taluka tour Nashik News)

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल‌ नांदगाव तालुका दौऱ्यावर असताना त्यांनी तालुक्यातील बाणगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देत पाहणी केली. या भेटी दरम्यान घडलेला हा सर्व प्रसंग त्याचीच चर्चा संपूर्ण तालुक्यात बुधवारी (ता.११) झाली.

या दौऱ्यात त्यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसोबत मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यानंतर सरपंच संगीता बागुल यांनी आशिमा मित्तल यांची भेट घेत त्यांना शाळेच्या समस्या सांगितल्या.

शाळेच्या मोडक्या इमारती मुळे २०१८ पासून पाठविण्यात आलेल्या निर्लेखनाच्या प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असल्याबद्दल कार्यवाही करण्याची मागणी केली. तसेच शाळेला वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यासह पदवीधर शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

विकास कामांचा घेतला आढावा

आशिमा मित्तल यांनी पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठक घेत आरोग्य गोल्डन कार्ड, कुपोषित व मध्यम कुपोषित बालके, प्रलंबित बांधकामे, जलजीवन मिशन, १५ वा वित्त आयोग, मनरेगाची कामे, लेखा विभागाचा आढावा, ग्रामसेवकाची कामे, कार्यालयीन तपासणी आदींचा आढावा घेतला.

मित्तल यांनी बचत गटाच्या स्टॉलला भेट देत धनादेशाचे वितरण केले. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांच्यासह खात्यांचे विभागप्रमुख, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT