ZP Nashik latest marathi news
ZP Nashik latest marathi news esakal
नाशिक

ZP Employees Transfer: जि.प. कर्मचाऱ्यांच्या आजपासून बदली प्रक्रीया

सकाळ वृत्तसेवा

ZP Employees Transfer : जिल्हा परिषदेच्या बहुप्रतिक्षेत असलेल्या कर्मचारी बदली प्रक्रीयेस मंगळवारपासून (ता. २३) सुरूवात होत आहे. गंगापूर रोडवरील मविप्रच्या होरायझन अॅकॅडमी येथे सामान्य प्रशासन, अर्थ व कृषी विभागातील बदल्या होणार आहेत.

बदल्यांसाठी सोमवारी (ता.२२) सर्व विभागांमध्ये कर्मचारी, अधिकारी यांची माहिती, यादी अपटेड करण्याची लगभग सुरू होती. (ZP Transfer process of employees from today nashik news)

गत तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या कर्मचारी बदली प्रक्रीयेत समतोल राखण्याच्या नावाखाली बदल्या टाळल्या जात होत्या. यंदाही समतोल राखायचा कसा यावरून प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता.

मात्र, यावर राज्य शासनाचेच तोडगा काढला असून, बदली प्रक्रीयेत १० टक्के प्रशासकीय तर १० टक्के विनंती बदल्या करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे बदली प्रक्रीया करण्याची तयारी सामान्य प्रशासन विभागाने केली आहे.

मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशान्वये बदली प्रक्रीया राबविली जाणार आहे. १० टक्के प्रशासकी, १० टक्के विनंती, आरोग्य व ग्रामसेवकांच्या ५ टक्के बदल्या करणार आहे.

त्यासाठी असणारी तयारी झाली असल्याचे माहिती उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिली. आरोग्य विभागाने बदली प्रक्रीयेला नकार दिल्याचे बोलले जात आहे. मात्र, ठरल्याप्रमाणे बदल्या केल्या जाणार आहे. या शिवाय ग्रामसेवकांच्या देखील बदल्या होतील, असेही श्री. पिंगळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अफवांवर विश्वास ठेवू नका

बदली प्रक्रीया सुरू झाल्यानंतर अनेक स्वयंघोषीत नेते तयार होतात. त्यांच्याकडून मी तूझी बदली करतो असे सांगत कर्मचाऱ्यांकडून पैसे मागितले जात असल्याचे प्रकार सुरू झाल्याची चर्चा आहे.

मात्र, बदली प्रक्रीयेसाठी कोणीही पैसे देऊ नये, शासन नियमाप्रमाणे बदली प्रक्रीया राबविली जाणार असल्याचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पिंगळे यांनी स्पष्ट केले. कोणताही अफवांवर विश्वास ठेवू नका, बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे.

आज होणाऱ्या बदल्या

तारीख वेळ विभाग
२३ मे २०२३ सकाळी १० ते २ सामान्य प्रशासन
दुपारी २.३० ते ४ अर्थ विभाग
दुपारी ४ ते ५.३० कृषी विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT