live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

गणेश विसर्जन मिरवणुकीला स्मार्टरोडचा अडथळा 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला असताना, विसर्जन मिरवणुकीतील स्मार्ट रोडचे काम पूर्णत्वास जाण्याची शक्‍यता नाही. तर पारंपरिक मार्गावरूनच विसर्जन मिरवणूक नेण्यावर गणेश मंडळ ठाम आहेत. त्यामुळे आज पोलीस, स्मार्टरोडचे अधिकारी आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मेहेर ते अशोकस्तंभपर्यंतच्या स्मार्टरोडची पाहणी करीत, यामार्गावरील अडथळे दूर करून येत्या दोन आठवड्यात काम पूर्णत्वास नेण्याचे आदेश स्मार्टसिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी ठेकेदारास दिले. 

येत्या 2 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून 12 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीला भद्रकालीतून प्रारंभ होऊन सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विसर्जित होते. त्यापार्श्‍वभूमीवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली असता, त्यावेळी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मेहेर सिग्नल ते अशोकस्तंभ या पारंपरिक मार्गावरूनच गणेश विसर्जन मिरवणूक जाईल यावर ठाम राहिले. त्यासंदर्भात आज स्मार्टसिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी, गणेश मंडळांचे पदाधिकारी समीर शेटे, प्रकाश तांबट यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मेहेर सिग्नल ते अशोकस्तंभ रस्त्याची पाहणी केली. 
गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या स्मार्टरोडचे काम अद्यापही पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ येथे मोठ्या आकाराचे गतीरोधक आहे. तर दुतर्फा रस्त्यांमध्येही चढउतार आहे. तर अनेकठिकाणी अद्यापही गज बाहेर आले आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीतील कार्यकर्ते, भाविकांना इजा पोहोचण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात प्रकाश थविल यांनी व्यवस्थापक विश्राम पाटील, अभियंता तुळशीदास सुतार यांना दोन आठवड्यात सदरची कामे पूर्ण करून विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडेल याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. 
 
मेहेर ते अशोकस्तंभ दरम्यानचा दुतर्फा रस्ता दोन आठवड्यात खुला केला जाईल. धोकादायक अडचणी दूर केल्या जातील. भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जाईल. 
- प्रकाश थविल, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्टसिटी प्रकल्प 

 
विसर्जन मिरवणूक मार्गावर चढउतार आहे. अपूर्ण कामांमुळे धोका पोहोचू शकतो. त्यासाठी महापालिका आयुक्त, स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अडचणी पाहण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यातून अडचणी दूर करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यानुसार अडचणी दूर होतील अशी अपेक्षा आहे. 
- हेमंत सोमवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सरकारवाडा. 

 
विसर्जन मिरवणूक मार्गात कोणताही बदल होणार नाही. स्मार्टरोडचे काम पूर्ण करावे. जेणेकरून मिरवणूक निर्विघ्न होऊ शकेल. मिरवणुकीतील एकेक मूर्ती 3 टनापेक्षा अधिक असल्याने रस्त्यातील दोष दूर करण्यात यावे. दूर्घटना घडल्यास त्यास महापालिका व स्मार्टसिटी प्रकल्पाधिकारी जबाबदार राहतील. 
- समीर शेटे, नाशिकचा राजा गणेश मंडळ. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT