smart road.jpg
smart road.jpg 
उत्तर महाराष्ट्र

नाशिकच्या स्मार्ट रोडचा खोळंबा कायम..वाहनचालक भडकले

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्मार्ट प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ या स्मार्ट रोडचे काम पूर्णत्वास गेलेले आहे. एकाच बाजूने रहदारी सुरू असून, दुसरा मार्ग बंदच ठेवलेला आहे. गेल्या दीड वर्षापासून वाहनचालकांची सुरू असलेली कसरत आजही सुरू असल्याने तीव्र संताप व्यक्त होतो आहे. 

काम पूर्ण होऊनही वापरावर निर्बंधच 

स्मार्ट प्रकल्पांतर्गत गेल्या दीड वर्षापासून त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ या रस्त्याचे स्मार्ट रोड म्हणून काम सुरू आहे, त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ रस्ता वाहतुकीसाठी खुला आहे. दुसरीकडे अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका हा रस्ता पूर्णत्वास गेलेला असतानाही ठिकठिकाणी दुरुस्तीच्या नावाखाली रोखला आहे. त्यामुळे या मार्गावर असलेले मध्यवर्ती बसस्थानक, जिल्हा न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय ही महत्त्वाची कार्यालये आहेत. याकडे शेकडो नागरिक रोज या मार्गाने येतात. त्यांना गेल्या दीड वर्षापासून स्मार्ट रोडच्या कामामुळे त्रास सहन करावा लागतो आहे, तर आज रस्ता पूर्णत्वास जाऊनही तो खुला न केल्याने वाहनचालकांना आजही कसरत करावी लागते आहे. यातच सीबीएस चौकात वाहतूक पोलिसांकडून नो-एन्ट्रीच्या नावाखाली दुचाकीचालकांची दंडात्मक लूट सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये कमालीचा संताप आहे. 

सीबीएस चौक खुला होणार कधी? 
मेहेर सिग्नलचे काम दोन आठवड्यांपासून खुले झाले आहे. त्यामुळे एम.जी. रोडने सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. मात्र सीबीएस चौकाचेही काम पूर्ण झालेले आहे. असे असतानाही सीबीएस चौक वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी अद्यापही वाहतुकीचा खोळंबा होतो आहे. हा चौक खुला कधी होणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT