Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : महापालिकेतील त्या अधिकाऱ्यांनी अंतर्मुख होण्याची गरज; कर्मचाऱ्यांचे आवडते अधिकारी जनतेचेही व्हावेत!

रमाकांत घोडराज

Dhule News : शहरात त्यातही विशेषतः महापालिकेत काही वर्षांत अनेक अधिकारी आले. नियमानुसार त्यांच्या बदल्याही झाल्या. यातील बहुतांश अधिकाऱ्यांनी महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जंगी भावनिक निरोप दिल्याचेही पाहायला मिळाले.

असाच ‘ऋणानुबंध’ सामान्य धुळेकर नागरिकांशी या अधिकाऱ्यांचा जुळलेला पाहायला मिळाला नाही. अर्थात, अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर तेथील नागरिक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले आहे. धुळ्यात मात्र असे चित्र दिसले नाही. ते का, असा जनमानसाचा प्रश्‍न आहे. (no municipal officers have gained place in minds of general public in dhule news)

पाच-सहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरवासयांच्या मूलभूत गरजा भागविण्याची तसेच शहराचा विकास करण्याची प्रामुख्याने जबाबदारी, पालकत्व असलेल्या महापालिकेत गेल्या काही वर्षांत अनेक अधिकारी आले. यात प्रामुख्याने आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांसह इतर विविध महत्त्वाच्या पदांवर अनेकजण येऊन गेले.

यातील कोणत्या अधिकाऱ्याने चांगले काम केले, कोणत्या अधिकाऱ्याने वाईट काम केले, हा प्रश्‍न नाही. त्याचे मूल्यमापन करण्याचा अधिकार कुणा एका व्यक्तीला मुळीच नाही. यातील काहींनी प्रसिद्धीच्या झोतात न येता प्रामाणिकपणे, कर्तव्याप्रमाणे अनेक चांगली कामे केली असतील.

तत्कालीन मुख्याधिकारी दिवंगत दिलीप पायगुडे यांचे नाव शहरातील सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य कर्मचारी आजही अभिमानाने काढतात. त्यांच्या कामामुळेच महापालिकेत त्यांच्या नावाने सभागृहदेखील आहे. हा अपवाद वगळता एकूणच शहरातील सर्वसामान्य जनतेच्या मनात इतर अधिकाऱ्यांपैकी किती जणांनी स्थान मिळविले असेल हा सुज्ञ नागरिकांचा खरा प्रश्‍न आहे.

समारंभ स्वागतार्ह

एखाद्या बड्या अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर त्यांना महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी निरोप देतात. निरोपाचा हा कार्यक्रम जंगी असतो. यात काही कर्मचारी, पदाधिकारी संबंधित अधिकाऱ्याचे कौतुक करतात. अर्थात, कर्मचाऱ्यांचा प्रमुख या नात्याने संबंधित अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण केलेल्या जागेची ती पावती असते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे असे कौतुक अन् निरोप समारंभ स्वागतार्ह ठरतात. पण, सर्वसामान्य जनतेच्या मनात अशा बदली होऊन जाणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल काय भावना असतील याचाही विचार कधीतरी होणे आवश्‍यक आहे. राज्यात, देशात अनेक ठिकाणी एखाद्या बड्या अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर तेथील सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले आहे.

संबंधित अधिकाऱ्याची बदली रद्द व्हावी, अशी मागणीही मतदार करतात. धुळे शहरात असे चित्र गेल्या काही वर्षांत पाहायला मिळालेले नाही. त्याचे काय कारण असेल, याचा शोध घेणे गरजेचे आहे.

स्थान निर्माण करण्याची गरज

शहरात छोटछोट्या गरजांसाठी नागरिकांना महापालिकेत खेटे मारावे लागतात. विविध समस्यांप्रश्‍नी रोज आंदोलने होतात. रस्ते, गटारी, पाणी, पथदीप, अतिक्रमण, स्वच्छता, कचरा संकलन, आरोग्य सुविधा अशा विविध प्रश्‍नांसाठी सर्वसामान्य नागरिक रोजच त्रस्त असतो. यातील काही जण यंत्रणेशी झगडत असतात.

इतर मुकाट्याने समस्या सुटण्याच्या प्रतिक्षेत असतात. शहरातील समस्यांचा मोठा गुंता जनतेच्या मनात असल्याने त्यांच्या मनात अधिकाऱ्यांसाठी जागाच शिल्लक नाही का असा प्रश्‍न आहे. याचा विचार करण्याची, त्यासाठी स्थानिक अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या गोतावळ्यातूनही प्रमुख अधिकाऱ्यांनी बाहेर पडण्याची गरज आहे.Dhule News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT