Case Paper esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: केसपेपरवर जातीऐवजी प्रवर्गाची नोंद! आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडून रुग्णालयांना निर्देश

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : कोणत्याही शासकीय आरोग्य संस्थेमध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांना जात विचारून त्यांचा अवमान होईल, अशी घटना कुठल्याही परिस्थितीत घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आदेश आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांनी सर्व जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांसह महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बाह्यरुग्ण रुग्णपत्रिका व आंतररुग्ण रुग्णपत्रिकेवर (केसपेपर) जात, जमात किंवा पोटजात अशी नोंद न घेता लाभार्थ्याच्या सामाजिक प्रवर्गाची नोंद करावी, असे आदेशात नमूद आहे. (Note of category instead of caste on case paper Instructions to Hospitals from Commissioner of Health Department Dhule News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आरोग्य विभागाच्या आयुक्तांचे आदेश जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना परिपत्रकान्वये आरोग्य आयुक्तांचे आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आरोग्य आयुक्त धीरज कुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हा आरोग्याधिकारी, सर्व जिल्हा चिकित्सक आणि सर्व महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना हे आदेश काढले आहेत. लाभार्थ्यांना जात विचारून त्यांचा अवमान होईल, अशी घटना कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही आरोग्य संस्थेमध्ये घडणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे.

तसेच यापुढे केसपेपरवर जात, जमात अगर पोटजात अशी नोंद न घेता लाभार्थ्यांची माहिती सामाजिक प्रवर्गानुसारच नोंदविण्यात यावी. सामाजिक प्रवर्गानुसार नोंद घेणे आवश्यक असल्याने नोंदणी शाखेतील कर्मचाऱ्यांचे व गरज भासल्यास लाभार्थ्यांचे योग्य समुपदेशन करण्यात यावे, असेही आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT