आबोने तांडा - शोषखड्डा तयार करताना जमनीबाई राठोड.
आबोने तांडा - शोषखड्डा तयार करताना जमनीबाई राठोड. 
उत्तर महाराष्ट्र

चालणारा- बोलणारा आजीबाईचा शोषखड्डा

सकाळवृत्तसेवा

जळगाव - जिल्ह्यात ‘पाणी फाउंडेशन’ नावाची जलचळवळ जशी सुरू झाली आहे तसे अनेक वॉटरहिरो समोर आले. त्यांच्या कहाण्याही आश्‍चर्यचकित करण्याबरोबर आपल्याला खूप काही शिकवून जाणाऱ्या आहेत.

जलसंधारणाबाबत सुशिक्षित आपण फारसे मनावर घेत नाही. मात्र आबोने तांडा येथील आदिवासी आजीने तयार केलेला शोषखड्डा चालणारा- बोलणारा ठरावा असाच आहे. 

चाळीसगाव तालुक्‍यातील जेमतेम १००-१५० उंबरा असणारा ‘आबोने तांडा’ नावाचा आदिवासी पाडा/तांडा/गाव. या आधुनिक काळातही भारतीय संस्कृती जपणाऱ्या, अशा एका जमातीचे इथे प्रामुख्याने वास्तव्य आहे. या तांड्यातील काही मंडळी ’पाणी फाउंडेशन’च्या ट्रेनिंग पूर्ण करून गावात आली. गावात येताच या मंडळींनी कामाची सुरवात केली. त्याची पहिली ठिणगी पडली ती म्हणजे ८५ वर्षांच्या आजीच्या स्वरूपात. जमनीबाई हरी राठोड असे तिचे नाव.८५ वर्षांत असंख्य उन्हाळे-पावसाळे बघणारी, निसर्गाची कृपा-अवकृपा अनुभवणारी या आजीबाईने , ‘प’ म्हणताच ‘पाणी’ ओळखलं अन्‌ कामाला लागली. वयामुळे शरीर जीर्ण झालेलं, चालणे तर सोडा, धड बसता-उठता येत नाही. अशा स्थितीत कसं करणार काम ? 

कसा होणार ह्या ठिणगीचा वणवा ? शरीराने साथ सोडली म्हणून काय झालं. ‘तीव्र इच्छाशक्ती दहा हत्तीचे बळ देतं’, ते काय उगाच म्हणत नाहीत.., त्याचा प्रत्यय सर्वांना ’याची देही याची डोळा आला’..

कशीबशी ती आजीबाई उठली अन्‌ टिकाव/फावडे हातात घेतला अन्‌ चक्क शोषखड्डा खोदू लागली. ते थरथरणारे हात, म्हातारपणामुळे कमी (थोडक्‍यात नाहीशी) झालेली ताकद, तरीही आजीबाई तशीच काम करत आहे-करत आहेच. दोन-चार टिकाव मारतोय, हाताने माती उकरते, माती काढते. परत टिकाव..., परत माती...

अन्‌ बघताबघता शोषखड्डा पूर्ण झाला सुद्धा. पाण्याची किंमत नसणाऱ्यांना शिकवण अंगापिंडाने धडधाकट असणाऱ्या अन्‌ पाण्याची किंमत व जाणीव नसणाऱ्या सर्वांसाठी ही खूप मोठी शिकवण होती, अन्‌ पाण्याची किंमत असणाऱ्यांसाठी खूप मोठी प्रेरणा देणारी. अभिमानाने उर भरून आणणारी ही घटना होती...!

आता ही अशी गोष्ट आहे म्हटल्यावर, चर्चा तर होणारच ना...! एकाच्या मुखातून दुसरीच्या मुखात ही शोषखड्ड्याची गोष्ट कौतुकाने सांगितली गेली, आणि सांगतच जात आहे, असा बोलतोय हा शोषखड्डा.

गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. पाण्यासाठी मी अनेक वर्षे हालअपेष्टा भोगल्या. पुढील पिढीसाठी पाणी मिळण्यासाठी मी शोषखड्डे तयार करीत आहे. सर्व नागरिकांनीही शोषखड्डे करून पाणी जमिनीत जिरवावे.
- जमनीबाई हरी राठोड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT