उत्तर महाराष्ट्र

मद्यधुंद अवस्थेत पेट्रोल ओतून एकास पेटविले

सकाळवृत्तसेवा

शिरपूर - मद्यधुंद युवकाने सलून कामगारावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना काल दुपारी शहरातील भवानी टेकवर घडली. गोपाल विठ्ठल शिरसाठ (46, रा. न्हावीवाडा, शिरपूर) असे जळिताचे नाव असून, त्याला धुळे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. 

भवानी टेकवर पाताळेश्वर मंगल कार्यालयाच्या मागील बाजूला महेश शिरसाठ यांच्या मालकीचे गौरी मेन्स पार्लर आहे. तिथे गोपाल शिरसाठ कामाला आहे. काल दुपारी तो काम करीत असताना संशयित छोटू धनगर (रा. धनगरवाडा, शिरपूर) हा मद्यधुंद अवस्थेत तेथे गेला. त्याच्या हातात पेट्रोलने भरलेली बाटली होती. "मी दुकानावर पेट्रोल टाकून पेटवून देतो' अशी धमकी त्याने दिली. गोपालने ती बाब थट्टेवारी नेली. "दुकानावर नको टाकू, वाटल्यास माझ्या अंगावर टाक' असे त्याने सांगितले. मात्र छोटू धनगरने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. गोपाल मागे सरकल्याने पेट्रोलचा भडका पायावर उडाला. त्याच्या कपड्यांनी पेट घेतला. पेटत्या शरीराने तो बाहेर पळाला. शेजारील हॉटेलबाहेर असलेल्या बादलीतील पाणी त्याने अंगावर ओतले. शेजारील दुकानदारांनी आग विझवून त्याला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्या कमरेखाली 35 टक्के भाजल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात छोटू धनगर याने काही कारण नसतांना पेटवून दिल्याचे म्हटले आहे. पोलिस निरीक्षक संजय सानप, सहायक निरीक्षक समाधान वाघ आदिंनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. छोटू धनगरच्या घरी पोलिसांनी चौकशी केली असता तो आढळला नाही. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून संशयिताविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT