Eknath-Chitte
Eknath-Chitte 
उत्तर महाराष्ट्र

कांद्यानं रडवलं अन्‌ संपवलंही..!

सकाळवृत्तसेवा

जायखेडा (नाशिक) - करंजाडच्या (ता. बागलाण) खैरओहोळ शिवारात कांदा उत्पादक तरुण शेतकऱ्याने बुधवारी (ता. २३) सायंकाळी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. तालुक्‍यात एकाच महिन्यात दोन शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याने चिंता व्यक्त होत आहे.

एकनाथ गोविंद चित्ते (वय २८) असे या शेतकऱ्याचे नाव असून, तो अविवाहित होता. सततची नापिकी आणि हातउसनवार व बॅंकेचे कर्ज कसे फेडायचे, या विवेचनात सापडलेल्या एकनाथने खैरओहोळ शिवारातील आपल्या शेतातच विष प्राशन केले. 

कांदा सत्तर पैसे किलो 
चाळीत साठवून ठेवलेला १९ क्विंटल कांदा एकनाथने ११ जानेवारीला नामपुर बाजार समितीत विक्रीसाठी नेला असता, या कांद्याला किलोला सत्तर पैसे असा भाव मिळाला. त्यातून वाहतूक भाडेही पदरी न पडल्याने तो हताश झाला होता. शिवाय चाळीतील पडून असलेल्या तीस ते चाळीस क्विंटल कांद्याला कोंब फुटू लागले. त्यातच एक ते सव्वा एकरावर नव्याने कांदा लागवड केली आहे.  पाण्याअभावी या पिकानेही मान टाकल्याने एकनाथ चिंतेत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT