Organizing workshops for teachers of Nashik Zilla Parishad
Organizing workshops for teachers of Nashik Zilla Parishad  
उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी भरली कार्यशाळा

सकाळवृत्तसेवा

खामखेडा (नाशिक) : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी 'आय कॅन चेंज'ची भावना रुजावी व 'डिझाईन फॉर चेंज’ इंडिया' या संस्थेच्या  माध्यमातून  आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्हा परिषद शाळांची प्रोजेक्ट निवडले जाऊन मुलांना मोठे विचार करण्यासाठी संधी ग्रामीण भागातील शाळांमध्ये रुजावेत यासाठी जिल्ह्यातील निवडक शाळांमधील शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

नाशिक येथील इस्पॅलियर शाळेत प्राथमिक शिक्षकांसाठी डिझाईन फॉर चेंज’ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झणकर होत्या. शिक्षकतज्ञ सचिन जोशी यांनी कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून कामकाज केले. डिझाईन फॉर चेंज’ इंडिया या संस्थेचे अक्षत संध प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  

विद्यार्थी हा कृतीप्रवण असतो. शिक्षणाच्या केंद्रस्थानी घोकंपट्टी नको तर कृती हवी. शिक्षकांनी मुलांच्या प्रतिभेला वाव द्यावा. मुलांना विचारप्रवण करतील, असे प्रश्न निर्माण करण्याची संधी द्यावी. शिक्षणाबरोबरच बदल घडून आणणाऱ्या गोष्टी मुलांकडून करून घेत मुलांना हव्या असणाऱ्या गोष्टीत बदलण्यासाठी विचार करण्याची वृत्ती विद्यार्थ्यांत रुजवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याचे आय कॅन चेंज ही भावना विद्यार्थ्यांत रुजवण्यासाठी कोणत्या गोष्टीत बदल हवा यासाठी शिक्षकांनी चौकटी सोडून काम करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झणकर यांनी यावेळी शिक्षकांना केले.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अधिकाधिक शिक्षकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अलौकिक कल्पनांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी काम करण्याचे आवाहनही यावेळी शिक्षकांना केले.

दैनदिन जीवनात त्याला पडणाऱ्या शिक्षण, आरोग्य, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक अशा विविध प्रश्नातील समस्यांची उकल करून त्यांचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी  परावृत्त करण्यासाठी कोणकोणती उपक्रम राबवता येतील याबाबत सचिन जोशी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

या संस्थेत शिक्षकांनी आपली नोंदणी व उपक्रमाची अंमलबजावणी कशी करावी याबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले. इस्पॅलियर शाळेमधील नवनवीन प्रयोग त्यांनी यावेळी शिक्षकांना सांगितले.

यावेळी चांदवड तालुक्यातील पांढरीवस्ती, बागलाण तालुक्यातील मोरेनगर देवळा तालुक्यातील भावडे, फांगदर या शाळांचे समस्यांचे सादरीकरण केले.

कार्यशाळेस  जिल्ह्यातील पंचवीसहून अधिक शाळांमधील शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वीतेसाठी डिझाईन फॉर चेंज’ इंडिया या संस्थेतर्फे अक्षत संध,प्रिया जोशी,शिल्पा शर्मा,प्रतीक भांडारकर,सागर खात्रीसाल यांनी कामकाज पहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT