Valwadi: Praveen Salve and other office bearers protesting in the cemetery over the poor condition of the cemetery. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : ...अन्यथा मनपा आवारात अंत्यसंस्कार; वलवाडी स्मशानभूमीच्या दुरवस्थेचा प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिकेच्या हद्दवाढ क्षेत्रात असलेल्या वलवाडी येथील स्मशानभूमीची प्रचंड दुरवस्था झाली आहे.

तेथे लवकरात लवकर नूतनीकरण न झाल्यास मृतांवर महापालिकेच्या आवारात अंत्यसंस्कार करू असा इशारा शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपमहानगर प्रमुख प्रवीण साळवे यांनी दिला. मागणीसाठी थेट वलवाडी स्मशानभूमीत श्री. साळवे व इतर पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.

जवळपास लाखभर लोकसंख्येला वलवाडी स्मशानभूमी जवळ आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून या स्मशानभूमीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अत्यंसस्काराचे ओटे, त्याला असलेले जाळीचे संरक्षण पूर्णतः उखडले गेले आहे.(otherwise cremation at municipal premises question of state of disrepair of walwadi crematorium Dhule News)

शिवाय अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर या ठिकाणी पाण्याची कुठलीही व्यवस्था नाही. आतील भागातील काँक्रिट तसेच वाडीभोकर रोड ते स्मशानभूमीला जोडणारा फरशीपूल देखील वाहून गेले आहे. त्यामुळे पुलाचा बराचसा भाग उखडला आहे.

समस्यांचा विळखा

पावसाळ्यात या फरशीवरून कायमस्वरूपी पाणी वाहत असते. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जाणेही कठीण होते. त्यामुळे फरशीची उंची वाढविणे गरजेचे आहे. संपूर्ण स्मशानभूमीला समस्यांचा विळखा असताना मनपा प्रशासनाने गेल्या पाच वर्षात तेथे साधी डागडुजीदेखील केलेली नाही.

या भागातील चारही नगरसेवक हे भाजपचे आहेत. एकीकडे शहरात कोट्यवधी रुपयांचा विकास केल्याचा दावा भाजपकडून केला जात असताना, मूलभूत समस्येकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. वलवाडीवासीयांना कुणीच वाली उरलेला नाही असे श्री. साळवे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, लवकरात लवकर स्मशानभूमीत दुरुस्तीचे काम करावे अन्यथा मृतांवर महापालिकेत अंत्यसंस्कार करू असा इशारा श्री. साळवे यांनी दिला. दरम्यान, मागणीसाठी श्री. साळवे यांच्यासह माजी उपसरपंच व विभागप्रमुख प्रवीण पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक सुदाम शिरोळे, राजन वाघ, अक्षय पाटील, शुभम रणधीर, अमोल ठाकूर, अक्षय वाघ, प्रकाश शिंदे, लक्ष्मण बोरसे, हर्शल यादव, अमोल साळवे आदींनी स्मशानभूमीत आंदोलन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT