Laborers peeling raw papayas
Laborers peeling raw papayas  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : कच्च्या पपईतून अनेकांना रोजगार; चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पशुपालकांची गर्दी

कमलेश पटेल

Nandurbar News : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड होते. सध्या पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्यातील पपई सहसा व्यापारी खरेदी करीत नाहीत. लहान फळे व आकार नसलेल्या पपया कच्ची पपई (Raw Papaya) प्रकिया उद्योग करणारे व्यापारी खरेदी करीत असून, त्यामुळे प्रक्रिया उद्योगाला सुगीचे दिवस आले आहेत. (papaya industry has provided employment to hundreds of tribals nandurbar news)

या पपई उद्योगाने शेकडो आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर प्रक्रिया करण्याअगोदर निघणाऱ्या पपईच्या साल्ट्यांनी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नदेखील मार्गी लागत असून, तो चारा नेण्यासाठी गोपालकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील तापी नदीलगतचा पट्टा सध्या पपई उत्पादनात अग्रेसर असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी पपईला मिळणारा चांगल्या भावमुळे अनेक शेतकऱ्यांनी पपई लागवडीवर भर दिला आहे. शहादा तालुका हा सध्या पपई हब म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

अशातच या ठिकाणी पपईवर प्रक्रिया उद्योग करून त्यातून नफा मिळविणारे व्यापारीदेखील परजिल्ह्यातून दाखल होत असल्याने या ठिकाणी पपईवर होत असलेल्या प्रक्रियेमुळे अनेकांना रोजगार मिळत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

पपईपासून बनणाऱ्या चेरीसाठी या ठिकाणी कच्च्या पपईची साल काढून चिरून त्यात मीठ भरून ती जळगाव आणि अन्य जिल्ह्यांमधील उद्योगामध्ये पुरवठा केला जात आहे. यातून व्यापाऱ्यांना हंगामात पाच ते सहा लाखांचा फायदा होत असल्याचे चित्र आहे. शहरालगत असलेल्या तिखोरा ते कलसाडी रस्त्यावर विविध व्यापाऱ्यांनी कच्च्या पपईवर प्रक्रिया उद्योग थाटला आहे.

आदिवासी बांधवांना मिळतोय रोजगार

विशेष म्हणजे नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल भागात बेरोजगारीचे प्रमाण अधिक असल्याने या कामांसाठी मजूर वर्ग चांगल्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने यामुळे व्यापाऱ्यांचा हंगामही सुरळीत होत आहे.

अशातच पपईचे साल्टे काढले जात असल्याने ते गुरांना चाऱ्यासाठी आवश्यक असल्याने गोपालकदेखील चारा म्हणून संकलित करण्यासाठी प्रक्रिया उद्योगात आपली वाहने घेऊन दाखल होताना दिसून येत आहे.

सध्या पावसामुळे झालेली चाराटंचाई त्यातच पपईची साल विनामूल्य उपलब्ध होत असल्याने अनेक पशुपालांचे लाभ होत असल्याचे चित्र पपई उद्योगातून दिसून येत आहे. या ठिकाणी दररोज २०० ते ३०० कामगार काम करतात. यात एक टोपली पपई छिलून कुंडीमध्ये टाकण्याचे त्यांना नऊ रुपये दिले जातात. त्यानुसार दिवसभरात त्यांना २५० ते ३०० रुपये रोजगार उपलब्ध होतो. सकाळी सात ते दुपारी बारा-एकपर्यंत कामकाज चालते.

अशी करतात प्रक्रिया

प्रथमता पपईबागेतून कच्ची पपई आणल्यानंतर तिला मजुरांच्या सहाय्याने वरचे हिरवे साल्टे काढले जाते. आतील गराचे दोन भाग केल्यानंतर त्याला सिमेंट काँक्रिटच्या कुंड्यांत टाकले जाते. त्यात मीठ टाकल्यानंतर कुजविले जाते. कुजवून मग तो माल जळगाव तसेच इतर मोठ्या प्रक्रिया उद्योगांमध्ये पाठवला जातो व त्या ठिकाणी प्रक्रिया करून त्याची चेरी बनविली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT