Dhule Agriculture News : 20 बिघे मक्याच्या तोट्यांना तीन तीन भुणके; हिरवळीच्या खताची किमया

great production of maize crop by green manure dhule new
great production of maize crop by green manure dhule newesakal

Dhule Agriculture News : एसएसव्हीपीएस महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य जी. डी. पाटील यांनी वीस बिघे शेतात मका (Maize) फुलविला आहे. मक्याच्या प्रत्येक तोट्याला किमान भुणके लागलेले आहेतच. वीस ते पंचवीस टक्के तोट्यांना तीन तीन भुणके लागलेले आहेत. (great production of maize crop by green manure dhule news)

पेरणीपूर्वी हिरवळीच्या खताने ही किमया केली आहे. ठिबकने फुलविल्याने माफक पाणी आणि खर्चात मोठी बचत झाली आहे. प्राचार्य पाटील यांना किमान तीनशे क्विंटल मक्याचे उत्पादन अपेक्षित आहे.

निवृत्त प्राचार्य पाटील यांनी एसएसव्हीएस संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी टोटल डेव्हलपमेंट प्रोग्राम राबविले. विद्यार्थिप्रिय प्राध्यापक आणि प्राचार्यही झाले. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात काय करायचे याविषयी बराच खल होत असतो. मात्र पाटील यांनी काळ्या कसदार मातीची सेवा करण्याचे ठरविले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

great production of maize crop by green manure dhule new
Dhule News : उंदीरही सापडत नाही त्या जागेवर अभयारण्य नकोच! मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींचा सूर

शेती करताना फायद्याची की तोट्याची हा विचार न करता शेतीमाध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे ठरविले होते अन् रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. विशेष म्हणजे सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. विषमुक्त अन्नधान्य हा मूलमंत्र ते जोपासत आहेत.

त्यांनी रब्बीचा वीस बिघे मका टाकला आहे. मक्याची वाढ मोठी झाली आहे. तोट्याची वाढ सहा फुटांपेक्षा अधिक आहे. प्रत्येक तोट्याला किमान दोन आणि जास्तीत जास्त तीन भुणके लागले आहेत. केवळ एक भुणका पूर्ण पोसला जात नाही. पण हे सर्वच भुणके परिपूर्ण पोसले गेले आहेत. यासाठी फवारणी नाही. हिरवळीच्या खताचा अधिकचा फायदा झाल्याचे पाटील यांनी सांगितले.

"पावसाळ्यात मूग पेरला. तो दीड महिन्याचा झाल्यावर त्याच्यावर रोटा फिरविला. त्यानंतर बाजरी पेरली. आता रब्बीच्या अगोदर सोयाबीन पेरले. एक महिन्यानंतर रोटा फिरविला. या हिरवळीच्या खताचा मक्याला फायदा झाला आहे." -निवृत्त प्राचार्य जी. डी. पाटील, कापडणे

great production of maize crop by green manure dhule new
Dhule Unseasonal Rain : पिंपळनेरसह परिसरात अवकाळी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com