Paranormal criminal
Paranormal criminal 
उत्तर महाराष्ट्र

परप्रांतीय गुन्हेगार आता टार्गेटवर

सतीश निकुंभ

सातपूर - चुंचाळे परिसरात भंगार बाजाराच्या आसपास परप्रांतीयांची झोपडपट्टी वसत असून, यातील अनेक जण गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यामुळे या भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने परप्रांतीय गुन्हेगारीचा गंभीर मुद्दा उपस्थित केला होता. याप्रकरणी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल व उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दखल घेत औद्योगिक क्षेत्रातील ठेकेदार व त्यांच्याकडील कामगारांची माहिती गोळा करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे.

नाशिकला औद्योगिक वसाहतीत जिल्ह्याबाहेरील तसेच विविध राज्यांतून कामगार नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. काही जण गावाकडे मोठे गुन्हे करून नाशिकमध्ये छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये काम करतात. थोडे दिवस झाले, की पुन्हा गुन्हेगारीकडे वळतात. भंगार बाजार व त्याच्या अवतीभवती असलेल्या दत्तनगर, विराटनगर, चुंचाळे शिवार, म्हाडा कॉलनी, जाधव संकुल, श्रमिकनगर, राधाकृष्णनगर, सातपूरगाव मळे परिसर, राजवाडा, तसेच विविध झोपडपट्ट्यांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यांच्यातील अनेक जण नाव बदलून भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहात असल्याचे उघड झाले आहे. 

याबाबत पोलिसांनी भाडेकरूची माहिती मागवली असली तरी याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पोलिस आयुक्त सिंगल व उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी आता परप्रांतीय गुन्हेगारीचा शोध लावण्यासाठी सातपूर, अंबडमधील कंपन्यांमध्ये कामगार पुरवणारे ठेकेदार व त्यांच्याकडील कामगारांची माहिती मागवण्याचे काम सुरू केले आहे. यंत्रणेने कामगार उपायुक्त कार्यालयापासून ते कंपन्यांच्या एचआर विभागाकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. याबाबत सातपूर पोलिसांनीच कंपन्यांना नोटीस बजावण्याचे काम सुरू केले आहे. 

परप्रांतीयांचे गुन्हेगारीचे साम्राज्य
गेल्या काही महिन्यात बॉश, महिंद्र सोनासह विविध कारणांनी बंद असलेल्या एक्‍स्लो, सुमीत, एशियन इलेक्‍ट्रॉनिक नेटेलको आदी कंपन्यांमध्ये चोरीच्या घटनेत परप्रांतीय ठेकेदार व त्याच्याच कामगारांचा हात असल्याचे उघड झाले आहे. सातपूर-अंबड लिंक रोडवरील मंगलसिंग माझी याची हत्या असो अथवा अवैध व्यवसायातील पैशावरून जाधव खून प्रकरण असो, सातमाउली चौकात भरदुपारी गावठी कट्ट्याने गोळीबार करून आझमगढला फरारी झाल्याचे प्रकरण असो, यात परप्रांतीय गुन्हेगारांचाच हात असल्याचे उघड झाले आहे.

शहरातील गुन्हेगारी पाहता परराज्यातील गुन्हेगार स्थानिक गुन्हेगारांना हाताशी धरून आश्रय मिळवतात. औद्योगिक वसाहतीत ठेकेदाकडे नाव बदलून कामही मिळवतात. अशा गुन्हेगारांना शोधण्यासाठी प्रशासनाने ही मोहीम सुरू केली आहे. नाशिककरांच्या सुरक्षेसाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे
- श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस उपायुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT