MLA Kunal Patil esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : नंदाभवानी मंदिर कामाची स्थगिती उठली ः पाटील

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : रावेर (ता. धुळे) येथील श्री नंदाभवानी मंदिर परिसरातील पर्यटन व तीर्थस्थळ, तसेच कापडणे (ता. धुळे) येथील श्री जोगाई माता मंदिर परिसरातील कामाला दिलेली स्थगिती पाठपुराव्याअंती उठविण्यात आल्याची माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली. (Patil announce Nanda Bhavani temple work suspension lifted dhule news )

ते म्हणाले, की सतत पाठपुरावा केल्यानंतर श्री नंदाभवानी मंदिर परिसर विकासकामासाठी चार कोटी ९० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली. याबाबत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१ ला प्रश्‍न मांडला. तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची या देवस्थान परिसर विकासासाठी निधी मिळावा यासाठी भेट घेतली.

या कामास निधीसह मंजुरी मिळाली. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या कामास स्थगिती देण्यात आली. ती उठविण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यावरील स्थगिती उठविल्याने या मंदिर परिसर विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

मंजूर निधीतून नंदाभावनी परिसर विकासात मुख्य प्रवेशद्वार, भक्त निवास, प्रसादालय, सभामंडप, बगीचा व परिसर सुशोभीकरण, खेळणी साधने, विद्युतीकरण, पाणीपुरवठ्याची सोय, वाहनतळ, प्रसाधनगृह आदी कामे होतील.

जोगाई माता मंदिर

श्री जोगाई माता मंदिर परिसर विकासासाठी २७ लाख ५३ हजाराचा निधी मंजूर करून आणला. कापडणे ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जोगाई माता मंदिर परिसराच्या विकासकामांना दिलेली स्थगितीही उठविण्यात आल्याने कामांना गती मिळेल, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: मुंबईनंतर पुण्यातील कबुतर खाद्यबंदीचा वाद उच्च न्यायालयात, थेट पालिकेच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

Amar Kale News: शरद पवारांपाठोपाठ खासदार अमर काळेंचंही खळबळजनक विधान; म्हणाले, 'निवडणूक जिंकण्यासाठी...'

Rahul Gandhi Vs Election Commission: राहुल गांधींनी केलेले 'मत चोरी'चे आरोप अन् निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर; वाचा सविस्तर!

Pune Traffic : लाडक्या बहिणी आणि भाऊ अडकले वाहतूक कोंडीत

Delivery Boy Life: रक्षाबंधनला झेप्टो, स्विगी, ब्लिंकइटने कमवले ढीगभर रुपये, पण डिलिव्हरी बॉयची कमाई किती माहितीये?

SCROLL FOR NEXT