pink riksha
pink riksha 
उत्तर महाराष्ट्र

जळगाव शहरात महिलांसाठी आता "पिंक रिक्षा' 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव: महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मुंबई, ठाण्याच्या धर्तीवर जळगाव शहरातही लवकरच महिलांसाठी पिंक रिक्षा (अबोली रिक्षा) सुरू होणार आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्‍याम लोही यांच्या सहकार्याने मराठी प्रतिष्ठानने यासाठी पुढाकार घेतला असून, महिलांना रिक्षा चालविण्याच्या प्रशिक्षणासह अर्थसहाय्य देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
शहरासह जिल्ह्यातील रिक्षा व्यवसायात येण्यास इच्छुक महिलांसाठी "पिंक रिक्षा' उपक्रमाच्या माध्यमातून चांगल्या उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. या रिक्षा गुलाबी रंगातच उपलब्ध असून, यासाठी परिवहन विभागातर्फे महिलांना सहकार्य केले जाणार आहे. यासाठी महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देणे, लायसन्स काढण्यास मदत करणे, नवीन रिक्षा घेण्यास अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे आदी बाबींच्या पूर्ततेसाठीही प्रतिष्ठानतर्फे सहकार्य केले जाणार आहे. पिंक रिक्षाच्या माध्यमातून मुलांना शाळेत नेणे, महिला प्रवाशांना ने-आण करणे यासाठीही उपयोग होणार असून, रिक्षात महिलाचालक असल्याने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असल्याचे मत मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. जमील देशपांडे, सचिव विजय वाणी यांनी व्यक्त केले. 

नोंदणीसाठी आवाहन 
पिंक रिक्षा नावनोंदणीसाठी महिलांनी 1 ते 15 डिसेंबरपर्यंत आधारकार्ड, जन्मतारखेचा दाखला, शाळेचा दाखला, 2 पासपोर्ट फोटो या कागदपत्रांसह मराठी प्रतिष्ठानच्या गणपतीनगरातील कार्यालयात नावनोंदणी करण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. 

..अशी पुढे आली संकल्पना 
शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने महिला व विद्यार्थिनींकडून प्रवासासाठी खासगी रिक्षांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु, या रिक्षांमधून प्रवास करताना बऱ्याचदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही समोर येतो. त्यामुळे महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी "पिंक रिक्षा' या नावाची संकल्पना पुढे आली आहे. त्याचबरोबर महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी "पिंक रिक्षा' हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT